
Latur News : ऑइलचा तुटवडा असल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाली आहे. जुने रोहित्र बदलून नवीन रोहित्रही दिले जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पाणी असूनही त्यांना रब्बीच्या पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी मंगळवारी (ता. २३) सरकारकडे केली व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.
उन्हाळ्यामुळे रोहित्रावरील भार वाढला आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे, जळण्याचे प्रमाण वाढत आहे. पण रोहित्रासाठी ऑइल उपलब्ध नसल्याने रोहित्र दुरुस्ती करून दिली जात नाही. नवीन रोहित्रची मागणी केली तरी ते दिले जात नाही. त्यामुळे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी माजी आमदार देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने पाच हजार लिटर ऑइल मंजूर केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. उन्हाळ्यामुळे रोहित्रावरील भार वाढला आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे, जळण्याचे प्रमाण वाढत आहे. पण रोहित्रासाठी ऑइल उपलब्ध नसल्याने रोहित्र दुरुस्ती करून दिली जात नाही.
नवीन रोहित्रची मागणी केली तरी ते दिले जात नाही. त्यामुळे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी माजी आमदार देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. शेतकऱ्यांची म्हणणे ऐकून घेत देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
आम्ही शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ, शेतकऱ्यांचे कल्याण करू, असे राज्य सरकार सातत्याने म्हणते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून दिले जात नाही. ऑइलही नसल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिके जगवायची कशी, पशुधनाला पाणी द्यायचे कसे असे विविध प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केले जात आहे.
सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन मुबलक प्रमाणात ऑइल आणि रोहित्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांविषयी सरकारला काळजी उरलेली नाही. रोहित्र नसल्याने शेतकऱ्यांची पिके, भाजीपाला करपून जात आहे. शेतकऱ्यांनी हेलपाटे मारूनही त्यांना रोहित्र मिळत नाही.
त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई द्या, अशीही मागणी शेतकरी करीत आहेत. त्यांच्या व्यथा आम्ही सरकारपर्यंत पोचवल्या आहेत, असे देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी महावितरणचे मुंबईतील मुख्य अभियंता प्रवीण सरदेसाई यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांनी सायंकाळपर्यंत लातूर विभागासाठी पाच हजार लिटर ऑइल उपलब्ध करून दिले. त्यामुळे कोळपा, रामेगाव, लखमापूर, टाकळी, भातखेड्यासह चाळीस गावातील रखडलेल्या रोहित्र दुरुस्तीचे काम वेगाने होईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.