Hydroponics Farm: शेतकरीपुत्राने उभारला ‘हायड्रोपोनिक्स कॅफे फार्म’

Startup Success Story: नाशिकमधील कृषी पदवीधर शुभांकर पिंगळे यांनी ‘हायड्रोपोनिक्स कॅफे फार्म’ उभारून मातीशिवाय रासायनिक मुक्त भाजीपाला उत्पादन व कृषी पर्यटन यांना एकत्रित केले आहे. या प्रकल्पाने स्थानिक व विदेशी पर्यटकांचे लक्ष वेधले असून, कृषीतील नवकल्पना आणि स्टार्टअपचा उत्तम नमुना सादर केला आहे.
Shubhankaran Pingale
Shubhankaran PingaleAgrowon
Published on
Updated on

Nashik News: मखमलाबाद (ता. जि. नाशिक) येथील कृषी पदवीधर शुभांकर किरण पिंगळे या तरुणाने भारतातील पहिला ‘हायड्रोपोनिक्स कॅफे फार्म’ उभारला आहे. देशातील व विदेशी पर्यटकांना हा प्रकल्प भुरळ घालत आहे.

वडील किरण यांची शेतीची पार्श्वभूमी. द्राक्ष हे मुख्य पीक. २०२१ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काढणीयोग्य असलेली द्राक्षबाग सोडून देण्याची वेळ आली होती. निर्यातक्षम द्राक्ष विक्रीचा प्रश्न समोर होता. अशा परिस्थितीत साथरोगाची लाट कमी झाल्यानंतर त्यांनी संकटात संधी शोधली.

Shubhankaran Pingale
Hydroponics Fodder: हायड्रोपोनिकमध्ये चारा उत्पादनाची प्रक्रिया कशी?

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून याच द्राक्षबागेत मराठमोळी मिसळची मेजवानी सोबत द्राक्षांचा आस्वाद अशी नवी संकल्पना आणून ‘ग्रेप ॲम्बेसी’ या नावाने स्टार्टअप सुरू केले. वडिलांचा हाच उद्यमशीलतेचा वसा घेऊन प्रयोगशीलतेने काम करताना शुभांकरने कृषी पदवीनंतर कृषी आधारित ‘स्टार्टअप’चे स्वप्न पाहिले. याच जिद्दीने त्याने शहरातील नव्या पिढीची मागणी ओळखून ‘मातीपासून ओठापर्यंत, शेतापासून ताटापर्यंत’ हे ब्रीद घेऊन ‘ला विटीस’ या नावाने नाशिक शहरालगत गोदावरी नदीजवळ मखमलाबाद येथे ‘हायड्रोपोनिक्स कॅफे फार्म’ साकारला आहे.

हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी पॉलिहाऊस उभारून तशी शास्त्रीय पद्धतीने रचना केली. जेथे पूर्णतः रासायनिक फवारणीविना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून भाजीपाला उत्पादन घेतले जाते. येथे उत्पादित विदेशी व भारतीय भाजीपाला सलाड, सूप, पिझ्झा, पास्ता, बर्गर अशा वेगवेगळ्या अन्नपदार्थांसाठी काढणीपश्चात लगेच वापरला जातो. इटालियन, कॉन्टिनेन्टल व भारतीय पाककृती तयार केल्या जातात. नाशिकसह, मुंबई, पुणे या शहरांसह गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक यांसह अनेक विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.

Shubhankaran Pingale
Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेून वित्तसहाय्य

येथे कृषीसुसंगत राहणीमान आणि रसायन अवशेष मुक्त अन्नाला प्रोत्साहन देण्याचे कामकाज होत आहे. पर्यटन व स्वाद येथे पर्यटक घेतात. हा स्टार्टअप उभारण्यासाठी ‘ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड’ या योजनेअंतर्गत वित्तसहाय्य घेऊन प्रकल्प साकारला आहे.

भाजीपाला व सुगंधी वनस्पतीचे उत्पादन

हिरवा लोलो लेट्यूस, लाल लोलो लेट्यूस, रोमेन लेट्यूस, बटरहेड लेट्यूस, आइसबर्ग, केल, चिनी कोबी, ब्रोकोली, झुकिनी, काकडी रोझमेरी, बेसिल, थायम, लेमन ग्रास, पालक, अरुगुला रॉकेट, पुदिना, चेरी टोमॅटो, टोमॅटो, सेलेरी, मायक्रोग्रीन्स, ओरेगॅनो जलापेनोस, बेल पेपर, डायंथस (खाण्यायोग्य फूल), अजमोदा (ओवा), पर्पल बेसिल यांचे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान वापरुन उत्पादन घेतले जात आहे.

असे आहे वेगळेपण

सफेद, काळी व लाल रंगाच्या १२ द्राक्ष वाणांच्या परिसरात लागवडी व द्राक्षाचे आच्छादन.

मातिविना हायड्रोपोनिक्स भाजीपाला यासह मायक्रोग्रीन्स उत्पादन युनिट.

ताज्या भारतीय, विदेशी भाज्या व सुगंधी वनस्पती थेट ग्राहकांसमोरच तोडणी करून पाककृतीत वापर.

‘हायड्रोपोनिक्स कॅफे फार्म’मध्ये खवय्यांसाठी बैठक व्यवस्था.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com