
Construction Business: कृषिक्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रातील शिक्षित तरुणांना या व्यवसायाकडे पाहताना कालानुरूप बदलता दृष्टिकोन ठेवावा लागतो. या व्यावसायिकांपैकीच एक आहेत कृषिपदवीधर रवींद्र कृपावती रामचंद्र धनक.
शेती आणि डेअरी व्यवसायाचा रवींद्र कृपावती रामचंद्र धनक यांना चांगला अनुभव आहे. शेतीमध्ये त्यांनी हायटेक शेतीचा पर्याय निवडला. यातूनच ते यशस्वी शेती उद्योजक बनले. आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य, उद्योजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी व्यवसायाला नवी दिशा दिली. शेती आणि दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगल्या प्रकारे वापर केला.
याचा त्यांना चांगला फायदा झाला. या प्रवासामध्येच त्यांना व्यवसायाच्या नवीन संकल्पना सुचल्या. विख्यात उद्योगपती आणि बांधकाम क्षेत्रातील जाणकार बी. जी. शिर्के यांच्या मार्गदर्शक तत्त्वांना समोर ठेवून त्यांनी ५६ सदनिकांचा प्रकल्प हाती घेतला. महाराष्ट्रातील अग्रगण्य रचनाकार जी. ए. भिलारे यांच्या मदतीने या प्रकल्पाचे आरेखन करून घेतले. आर्किटेक्ट कल्पेश चोरडिया यांच्याकडून तांत्रिक तपशील, अहवाल अभ्यासला. त्यानंतर प्रकल्पास सुरुवात केली.
प्रकल्पाची आखणी आणि पूर्तता यांच्यातील प्रत्येक टप्प्यावर बांधकाम तंत्रज्ञानातील अपेक्षित गुणवत्ता मापदंडानुसार राखली जाईल, तसेच हे सर्व काम शाश्वत विकासाच्या निकषांच्या कसोटीलाही उतरेल याची काळजी घेतली गेली.
त्यामुळे सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत उच्च जीवनशैलीचे घर देण्याचे स्वप्न साकार होऊ शकले. भागभांडवलाची उभारणी करताना १०० टक्के लोकसहभागातून हा प्रकल्प उभारताना उद्योजकीय आर्थिक शिस्तीचे भान ठेवत खर्चावर नियंत्रण, सदोदित नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत शाश्वत विकासाचे भान ठेवून गुणवत्तेवर बारीक लक्ष ठेवले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.