Natural Farming : पालघरची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल

Organic Farming : पालघर जिल्ह्यात रासायनिक पद्धतीने शेती करणारे शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. नत्रयुक्त खतांचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होताना दिसत आहे.
Palghar Agriculture
Natural Farming Agrowon
Published on
Updated on

Palghar News : पालघर जिल्ह्यात रासायनिक पद्धतीने शेती करणारे शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. नत्रयुक्त खतांचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होताना दिसत आहे. मात्र त्यावर आळा घालून सेंद्रिय पद्धतीने जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क यांचा शंभर टक्के वापर करून नैसर्गिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतकरी गट, सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना चांगल्या प्रतीचा सेंद्रिय शेतमाल विकता येण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विनायक पवार यांनी सांगितले.

Palghar Agriculture
Natural Farming : नैसर्गिक शेतीसाठी धार्मिक दौऱ्याला आयुक्तालयाचा नकार

यावेळी सेंद्रिय शेती ही आरोग्यासाठी फायदेशीर असून त्याचा फायदा नागरिकांना होत असल्याने मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीमालाचाही मागणी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यातील केव्हीके कोसबाड हिल आणि डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्य पुरस्कृत आत्मा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकरी कंपनी सदस्यांना शेतीचे व्यवस्थापन आणि प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

Palghar Agriculture
Natural Farming : रसायनमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार गरजेचा

रसायनमुक्त शेती फायदेशीर

नैसर्गिक किंवा रसायनमुक्त शेती ही अशी पद्धत आहे, ज्यामध्ये युरिया, डायमोनियम फॉस्फेट व इतर कृत्रिम खते, कीटकनाशके यांच्याऐवजी गाय व म्हशीचे शेणखत, मूत्र, गांडूळ खत, हिरवळीची खते, कंपोस्ट खत या नैसर्गिक घटकांचा वापर शेतकरी आपल्या शेती पद्धतीमध्ये करीत आहेत. त्यामुळे रसायनमुक्त शेती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

नैसर्गिक शेती विविध समस्यांवर उपाय

अन्न असुरक्षितता, शेतकऱ्यांची समस्या, खतांच्या आणि कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती, रोजगार निर्माण करण्याची क्षमता देखील आहे. यामुळे ग्रामीण तरुणांचे स्थलांतर थांबते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com