
Parbhani News : वाढत्या उष्णतेमुळे पिकांची पाण्याची गरज वाढली आहे. मात्र पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक भागात १५ ते २० हून अधिक दिवसांपासून पाणी मिळाले नाही. ऊस, भुईमूग, केळी आदी पिके होरपळली आहेत. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची तूट-फूट झाल्यामुळे वहन क्षमता कमी झाली आहे. परिणामी परभणी जिल्ह्यातील पिकांच्या सिंचनासाठी अपेक्षित विसर्गाने पाणी मिळत नाही. त्यात पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे आवर्तनाचे वेळापत्रक कोलमडले आहे. तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. या स्थितीत पिकांची पाण्याची गरज वाढली आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांत कालव्याच्या वितरण प्रणालीअंतर्गंत शाखा कालवे, वितरिका, शेत चाऱ्यांचे जाळे आहे. वेळापत्रक कोलमडल्याने रब्बी आवर्तनाचा कालावधी वाढला. सध्या उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन सुरू आहे.
२२०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अनेक वर्षापासून मुख्य कालव्याची दुरुस्ती नाही. अस्तरीकरण तसेच फरशाची तुटफुट झाली आहे. पाण्याची नासाडी होत आहे. झाडे,झुडपे वाढली आहेत. गाळ जमा झाला आहे. वहन क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्यात किमान १२०० क्युसेक विर्सगाने पाणी मिळणे
अपेक्षित असताना जेमतेम ७०० क्युसेक्सने मिळत आहे.
लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था कार्यरत नाहीत.आवर्तनाच्या व्यवस्थापनासाठी जलसंपदा विभागाकडे पुरसे मनुष्यबळ नाही. वरच्या भागातील वितरिका, शेत चाऱ्यांचे दरवाजे परस्पर उघडले जातात. पंप बसवून अनधिकृतरीत्या उपसा केला जात आहे.त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोका कडील परभणी, पूर्णा तसेच इतर तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी इच्छित विसर्गाने पाणी मिळत नाही.
धरण भरल्यामुळे परभणी जिल्ह्यातील डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात ऊस, केळी लागवड तसेच उन्हाळी भुईमूग तसेच चारा पिकांचा पेरा वाढला आहे. परंतु पाण्याअभावी अनेक भागातील पिके वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही.पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणी कमी मिळाल्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.