Fruit Vegetable Plantation
Fruit Vegetable PlantationAgrowon

Horticulture Farming : खानदेशात फळ पिकांना पसंती

Vegetable Farming : खानदेशात पाऊसमान चांगले राहील या अपेक्षेने कांदा, टोमॅटो, पपई, केळीची लागवड अपेक्षेपेक्षा अधिक झाली.
Published on

Jalgaon News : खानदेशात पाऊसमान चांगले राहील या अपेक्षेने कांदा, टोमॅटो, पपई, केळीची लागवड अपेक्षेपेक्षा अधिक झाली. अजूनही केळी, भाजीपाला पिकांना शेतकरी पसंती देत आहेत. अन्य पिकांत फारसा पैसा नाही. तसेच जोखीम वाढली आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीपाठोपाठ भाजीपाला पिके, उसाची लागवड केली आहे. खरिपात कापूस, ज्वारी, उडीद, मुगाची लागवड कमी होईल, असे दिसत आहे. ऊस लागवड खानदेशात वाढली आहे. नंदुरबारात १६ हजार हेक्टर, जळगावात सुमारे १४ हजार हेक्टरवर आणि धुळ्यास सुमारे सात हजार हेक्टरवर ऊस पीक आहे.

Fruit Vegetable Plantation
Vegetable Farming: हवेली भागातील गावे झाली कोथिंबिरीचे क्लस्टर

पुढे उसाला योग्य हमीभाव जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागवड झाली आहे. केळीचे दर टिकून आहेत. यामुळे केळी लागवडही मागील व आताच्या हंगामात अधिक दिसत आहे. खानदेशात केळीचे क्षेत्र ६५ ते ६८ हजार हेक्टर एवढे असायचे. परंतु यदा ८० ते ८५ हजार हेक्टरवर केळीची लागवड होईल, असे दिसत आहे. एकट्या जळगावातील क्षेत्र ७५ हजार हेक्टरवर आहे.

Fruit Vegetable Plantation
Vegetable Farming : कळवण तालुक्यात कोबी पिकाला पसंती

जोखीम अधिक

लहरी हवामान, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आदी नैसर्गिक घटक शेतकरी बांधवांच्या अडचणीत वाढ करीत असतात. ही संकटे असतानाही शेतकरी यंदा फळ व भाजीपाला पिकांना पसंती देत आहेत.

कापूस, तूर, उडीद, सोयाबीनला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. मात्र तरीदेखील शेतकरी बांधव न खचता मोठ्या आशेने व जोमाने नियोजन करीत आहेत. कापूस, तूर उत्पादनाचा भांडवली खर्च दोन पटीने वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com