Crop Insurance Scheme : विमा योजनेला कमी प्रतिसाद

Kharif Season 2025 : सरकारने एक रुपयात पीकविमा बंद केल्यामुळे आणि योजनेतील नियमांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा विमा उतरवण्यास नापसंती दर्शविली आहे.
Crop Insurance Scheme
Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Satara News : सरकारने एक रुपयात पीकविमा बंद केल्यामुळे आणि योजनेतील नियमांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा विमा उतरवण्यास नापसंती दर्शविली आहे. सातारा जिल्ह्यातील ९ लाख नऊ हजार ५६९ शेतकऱ्यांपैकी केवळ सहा हजार ५२२ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले असून त्यातील दोन हजार ४०३ शेतकऱ्यांनीच विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली असल्याचेच दिसत आहे.

पीक वाढीच्या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट, पूर परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्ती किंवा कीड, रोगांमुळे नुकसान झाल्यास यापूर्वी नुकसान भरपाई मिळत होती. एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना चार ट्रीगरवर नुकसानभरपाई देण्यात येत होती.

Crop Insurance Scheme
Crop Insurance : पीकविम्याकडे शेतकऱ्यांचा काणाडोळाच

नवीन बदलानुसार त्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्‍चात नुकसानभरपाई हे ट्रीगर काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे पीकविमा काढताना नवीन अटी परवडणार नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

आता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के रक्कम ही विमा हप्त्याची रक्कम म्हणून भरावी लागणार आहे. सरकारने पीक विम्याच्या पद्धतीत बदल केला आहे.

Crop Insurance Scheme
Crop Insurance Scheme: कंपन्यांना आठ वर्षांत साडेदहा हजार कोटी नफा

त्यामुळे विमा हप्ता भरताना शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू लागला आहे. त्याचबरोबर विम्याची रक्कम मंजूर करण्यासाठी नियमातही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९ लाख नऊ हजार ५६९ शेतकऱ्यांपैकी केवळ सहा हजार ५२२ शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले असून त्यातील दोन हजार ४०३ शेतकऱ्यांनीच विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली असल्याचेच दिसत आहे.

ई-पीक पाहणीची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक

पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. पीक कापणी प्रयोगाबरोबरच पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीअंतर्गत पिकांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या पिकांची नोंद पीक पाहणीअंतर्गत करण्यात आली आहे. त्या पिकांचाच विमा उतरवता येणार आहे. त्यामुळे ही जाचक अटही विमा न उतरवण्यास कारणीभूत ठरत आहे.

तालुक्याचे नाव अर्ज केलेले शेतकरी हप्ता भरलेले शेतकरी

जावली ३० १७

कऱ्हाड ६११ २७४

खंडाळा ३४१ १२१

खटाव १८९३ ७१०

कोरेगाव २०९ ९८

महाबळेश्वर २ १

माण २८६३ ९४५

पाटण २५९ ७९

फलटण ५४ ३५

सातारा ९४ ४०

वाई १६६ ८३

एकूण ६५२२ २४०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com