Farmer Protest : शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे 'चलो दिल्ली' आंदोलन सुरूच

Chalo Delhi Agitation : आंदोलक दिल्ली चलो मोर्चावर ठाम असून पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेने त्यांचे समाधान झाले नाही.
Farmers protest
Farmers protestAgrowon
Published on
Updated on

Haryana News : शंभू सीमेवर ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनपरिवर्तन करण्यात हरियाना पोलिसांच्या अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाना पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकरी नेत्यांशी रविवारी (ता. २५) चर्चा केली. परंतु आंदोलक दिल्ली चलो मोर्चावर ठाम असून पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेने त्यांचे समाधान झाले नाही.

एडीजीपी जसकरण सिंह, एआयजी संदीप गर्ग यांच्यासह शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. पाच दिवसांतील या दुसऱ्या बैठकीतही कोणताही तोडगा निघू शकला नाही. बैठकीत पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महामार्गाच्या दोन्ही बाजूची एक लेन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

Farmers protest
Kangana Ranaut On Farmers Protest : आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला, बलात्कार झालेत, शेतकरी आंदोलनावरून खासदार कंगनाचे वादग्रस्त विधान

पण ट्रॅक्टर ट्रॉली सोडता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावर शेतकरी नेत्यांनी सांगितले, की शंभू सीमा उघडण्याची आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून आम्ही ट्रॅक्टर आणि ट्रॉली सोडू शकत नाही.

Farmers protest
Farmers Protest : शंभू सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच; दुसरी बैठकही अनिर्णित

शंभू सीमेवर तोडगा निघावा अशी शेतकऱ्यांचीही अपेक्षा असल्याचे या वेळी एका अधिकाऱ्याने सांगितले. शंभू सीमा उघडणे हा महत्त्वाचा विषय असून तो सोडविण्यासाठी यापुढेही बैठका घेतल्या जातील. रविवारी झालेली बैठक शांततेच्या वातावरणात पार पडली. या वेळी अनेक मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीनंतर सर्वन सिंह पंढेर यांनी सांगितले, की या आधीही केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या चार फेऱ्या पार पडल्या आहेत. आताही बैठका सुरू आहेत. आम्ही चर्चेस तयार आहोत. पण केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला तरच ते शक्य आहे. पंजाबमध्ये आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न निर्माण झाला नाही. त्यामुळे पंजाबच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात तसे सांगावे, अशी मागणीही सर्वन सिंह पंढेर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com