Farmer Protest: २३ फेब्रुवारीला नोएडातील शेतकरी दिल्लीकडे कूच करणार | घोषणा करूनही कांदा निर्यात बंदी उठण्याची अधिसूचना नाहीच! | राज्यात काय घडलं?

कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत रविवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण मंगळवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंतही अधिकृत अधिसूचना काढण्यात आली नव्हती.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon

दिल्लीत नोएडाचे शेतकरी आंदोलक धडकणार?

नोएडा आणि ग्रेटर नोएडा आंदोलक शेतकरी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे कूच करणार आहेत. हे आंदोलन नोएडा भागातील शेतकऱ्यांचं आहे. सरकारनं घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारण्यात आले आहे. यापूर्वी ८ फेब्रुवारीला नोएडा आणि ग्रेटर नोएडा भागातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची स्थानिक अधिकारी आणि उत्तर प्रदेश सरकारच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. या आंदोलनात महिलांचाही समावेश होता. मात्र शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली गेली नाही. त्यामुळे नोएडा आणि ग्रेटर नोएडा भागातील शेतकऱ्यांनी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे.  

शेतकरी आंदोलकाचा मृत्यू

पंजाबमधील ४५ वर्षीय नरींदर पाल या शेतकऱ्याचा आंदोलना दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाल बठोई कलन गावाचे रहिवाशी होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदेर सिंग यांच्या पटियाला येथील घरासमोर भारतीय किसान युनियन एकता उग्रहण संघटनेकडून आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनात नरींदर पाल सहभागी होते. या आंदोलना दरम्यान त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रंजीद्र हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान पाल यांचा मृत्यू झाला. आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारी नोकरी, कर्जमाफी आणि १० लाख रुपयांची मदत सरकारने करावी, अशी मागणी शेतकरी नेते डलबारा सिंह चाजला यांनी केली आहे. यापूर्वी शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. 

मराठा आरक्षण विधेयकाला मंजूरी

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी (ता.२०) विशेष अधिवेशन राज्य सरकारनं बोलवलं होतं. या अधिवेशनात मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडलं. मुख्यमंत्री म्हणाले, "मराठा समाजाच्या एकजूट आणि चिकाटाचा हा विजय आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्यात आलं आहे. हा मनोज जरांगे यांचा विजय आहे." असं मुख्यमंत्री म्हणाले.

मनोज जरांगे यांनी मात्र उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे म्हणाले, "या निर्णयाचं स्वागतच करतो पण आमची मागणी कुणबी नोंदी सापडलेल्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. आणि सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अमलबजावणीची मागणी आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही मिळवू. आत्ताचं आरक्षण टिकेल का? अशी शंका आहे. उद्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहोत." असंही जरांगे म्हणाले. विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर टीका केली. वड्डेटीवार म्हणाले, "दोनदा नाकरलेलं आरक्षण तिसऱ्यांदा दिलं आहे. निवडणुकाची वेळ मारून नेण्यापुरतीची सोय आहे. हे आरक्षण टिकणारं नाही. सभागृहात विरोधकांना बोलूही दिलं नाही. हे फसगत करणारं सरकार आहे," अशी टीका वड्डेटीवार यांनी केली.

Farmer Protest
Cotton MSP : कापसाची हमीभावाने खरेदी केली नाही तर होणार गुन्हा दाखल ?|संयुक्त किसान मोर्चा दिल्लीत धडकणार?

कांदा निर्यातबंदी उठणार का?

केंद्रीय मंत्री भारती पवारांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करून दोन दिवस उलटून गेले. पण अजूनही कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत अधिकृत अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अधिसूचना कधी काढण्यात येईल? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी फोन कॉलवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक नाही, असं उत्तर दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारची कांदा निर्यातबंदी उठवण्याची घोषणा म्हणजे कांदा उत्पादकांची फसवणूक असल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात आहे.

कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत रविवारी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण मंगळवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंतही अधिकृत अधिसूचना काढण्यात आली नव्हती. एरव्ही कांदा दर वाढल्याची कसलीही ओरड नसतानाही केंद्र सरकार रातोरात कांदा निर्यात बंदीची अधिसूचना काढतं. पण आता मात्र निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करूनही अधिसूचना काढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com