
Parbhani News : यंदाच्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १४ पैकी ८ तालुक्यांमध्ये रब्बीची सरासरीहून अधिक पेरणी झाली आहे. शुक्रवार (ता. ३) पर्यंत परभणी जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ५१७ हेक्टर (११२.४५ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ५५ हेक्टर (११०.८३टक्के) पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यात मिळून एकूण ५ लाख ५७२ हेक्टरवर पेरणी झाली अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ असताना प्रत्यक्षात ३ लाख ४ हजार ५१७ हेक्टरवर (११२.४५ टक्के ) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ९४ हजार ८५७ हेक्टर (८३.८८ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २८ हजार ९९१ हेक्टर (७३.७५ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी१ हजार ८१ हेक्टर (५१.८१टक्के) पेरणी झाली.
हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७१ असताना प्रत्यक्षात १ लाख ७७ हजार ७८३ हेक्टर (१५८.४९टक्के) पेरणी झाली. परभणी, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या ६ तालुक्यांमध्ये सरासरीहून अधिक तर जिंतूर, सेलू, सोनपेठ या ३ तालुक्यात सरासरीहून कमी पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७६ हजार ८९१ असताना प्रत्यक्षात १ लाख ९६ हजार ५५ हेक्टरवर (११०.८३ टक्के) पेरणी झाली आहे.त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ असताना प्रत्यक्षात १३ हजार ८८६ हेक्टर (११८.७१ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २९ हजार ४२३ हेक्टर, मक्याची ९७१ पैकी ५५२ हेक्टर (५६.८६ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याची प्रत्यक्षात १ लाख ४८ हजार ५५ हेक्टर (१२३.२५ टक्के) पेरणी झाली.
परभणी-हिंगोली जिल्हे रब्बी पेरणी स्थिती
(क्षेत्र हेक्टरमध्ये) स्रोत कृषी विभाग
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी ५७९०० ६१४१० १०६.०६
जिंतूर ५३७३० ५२४९८ ९७.७१
सेलू ३३५६१ ३३१६४ ९८.८२
मानवत १६११९ २१३४३ १४५.७६
पाथरी १७०७२ २४८८५ १४५.७६
सोनपेठ १५६९८ १५४५७ ९८.४६
गंगाखेड ३२०८६ ३३८४३ १०५.४८
पालम २०१३० २१३५० १०६.०६
पूर्णा २४४९५ ४०५६६ १६५.६१
हिंगोली ३१०७४ .४३६७१ १४०.५४
कळमनुरी ५०१४६ ४९५४८ ९८.८१
वसमत ४२०१९ ३४७७० ८२.७५
औंढा नागनाथ २५७२६ ४१५२१ १४०.५४
सेनगाव २७९२६ २६५४४ ९५.०६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.