Agrowon Vietnam Tour: ‘अॅग्रोवन’च्या व्हिएतनाम कृषी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकरी रवाना

Maharashtra Farmers' Foreign Tour: अॅग्रोवन’कडून आयोजित करण्यात आलेल्या व्हिएतनाम कृषी अभ्यास दौरा व स्थलदर्शनासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह ३४ प्रतिनिधी रविवारी (ता. १) रवाना झाले.
Foreign Tour
Foreign TourAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘अॅग्रोवन’कडून आयोजित करण्यात आलेल्या व्हिएतनाम कृषी अभ्यास दौरा व स्थलदर्शनासाठी राज्यातील शेतकऱ्यांसह ३४ प्रतिनिधी रविवारी (ता. १) रवाना झाले. या दौऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेने आर्थिक साहाय्य दिले आहे. दौऱ्यातील प्रतिनिधींना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिखर व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे,

मुख्य महाव्यवस्थापक अशोक माने, उपमहाव्यवस्थापक दिलीप बावळे, संदीप चव्हाण, दीपक लांबोळे, व्यवस्थापक अमोल रणखांबे तसेच ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते. शेतीमाल निर्यातदार आणि प्रशिक्षक धनश्री शुक्ल या दौऱ्यातील सहभागींना मार्गदर्शन करीत आहेत.

Foreign Tour
Foreign Tour : नेदरलँड, बेल्जियम दौऱ्यासाठी केळी निर्यातदार विष्णू पोळ यांची निवड

व्हिएतनाममधील फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र, व्हॅक्यूम फ्राइड स्नॅक्स फॅसिलिटी युनिट, ज्यूस-पल्प एक्स्ट्रॅक्शन युनिट, भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, सेंद्रिय भात शेती, यांत्रिक शेती, सिंचन व मृदा व्यवस्थापन युनिट्सना या दौऱ्यात भेटी देण्याचे नियोजन आहे. तसेच तेथील व्यापारी, उद्योजक तसेच आयात-निर्यात क्षेत्रातील उच्चपदस्थांसोबत चर्चा केली जाणार आहे.

Foreign Tour
Foreign Study Tour : शेतकऱ्यांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी १ कोटी ४० लाखांच्या निधीला मान्यता

व्हिएतनाम हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश आहे. काळी मिरी, काजू, कॉफी, रबर, मासे यांची उत्पादन वाढ साध्य करीत या देशाने जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. व्हिएतनामच्या शेतकऱ्यांनी मसाले, फ्रोजन भाजीपाला, फळे, व्हॅक्यूम स्नॅक्स, फ्रुटपल्प, फ्रोझन व्हेज प्रॉडक्ट्स यांची निर्यात कशी वाढवली, तसेच ड्रॅगन फ्रूट, सुकवलेले मसाले आणि फळांचे अर्क यांच्या निर्यात व प्रक्रियेच्या क्षेत्रात जगभरातील बाजारपेठांमध्ये कसा दबदबा निर्माण केला याचा अभ्यास राज्यातील शेतकरी दौऱ्यात करणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना निर्यात किंवा प्रक्रिया क्षेत्रात नवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. तसेच, सध्या या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना व्यवसाय विस्ताराचे उद्दिष्ट असते. अशा दोन्ही घटकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी ‘अॅग्रोवन’ने विदेश अभ्यास दौऱ्याचा उपक्रम सुरू केला. यापूर्वी ‘अॅग्रोवन’चे दोन्ही दुबई कृषी अभ्यास दौरे यशस्वी ठरले. याच उपक्रमाचा तिसरा टप्पा व्हिएतनाम दौऱ्याने सुरू होतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com