Crop Insurance Application : यवतमाळ जिल्ह्यात पीक विम्यासाठी दीड लाख अर्ज; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

Crop Insurance Response : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा काढला आहे. एक रुपयात विमा असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त नोंदणी झाली आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा काढला आहे. एक रुपयात विमा असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त नोंदणी झाली आहे. गेल्या १५ डिसेंबरपर्यंत एक लाख ४६ हजार २३४ अर्ज दाखल झाले असून, शेतकऱ्यांनी १ लाख ४७ हजार ८४२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे.

पेरणीपासून पीक काढणीपर्यंत गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी, पावसाचा खंड, पूर अशा नैसर्गिक संकटात पिकांची हानी होती. त्यांचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे पीक संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान पीकविमा योजना राबविली जाते. शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा काढून देण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यास पसंती दिली. १५ डिसेंबरपर्यंत १ लाख ४७ हजार ८४२ शेतकऱ्यांनी पीकविमा भरल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सोलापुरात ९५ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा; १ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे संरक्षण

पीकविम्यासाठी एक रुपयाच भरावा लागत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा भरून घेतला. मागील वर्षाच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षित वाढले आहे. यंदा २ हजार १७१ कर्जदार तसेच १ लाख ४४ हजार ६३ बिगरकर्जदार असे १ लाख ४६ हजार २३४ अर्ज दाखल झाले आहे. ९४ हजार ६३५ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. यंदा रब्बी हंगामातील १ लाख ४७ हजार ८४२ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याच्या तपासणीसाठी पथक रवाना

पावणेदोन लाख हेक्टरवर पेरा

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र अडीच लाख हेक्टर इतके आहे. यंदा रब्बी हंगामातील पेरणी उशिरा झाली. आतापर्यंत जवळपास दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा गव्हाचा आहे. अजूनही गव्हाचा पेरा सुरू असून, काही दिवस पेरणी होण्याची शक्यता आहे.

तालुका अर्जांची संख्या

आर्णी १३५२७

बाभूळगाव ३५३६

दारव्हा २१९३०

दिग्रस ६६०१

घाटंजी २७१०

कळंब ५३८१

केळापूर ४०३१

महागाव २१२६२

मारेगाव २०७६

नेर ८७४०

पुसद १४३०५

राळेगाव २६७४

उमरखेड ३०४७२

वणी २१३४

यवतमाळ ४१११

झरीजामणी २७४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com