Heavy Rain : दमदार पावसामुळे गव्हाचा पेरा वाढणार

Kharif Agriculture : मागील सप्ताहात जिल्ह्यात अनेक भागांत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील कामे ठप्प झाली होती. आता पावसाने उघडीप दिली आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मागील सप्ताहात जिल्ह्यात अनेक भागांत झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील कामे ठप्प झाली होती. आता पावसाने उघडीप दिली आहे. झालेल्या पावसामुळे जलाशयात समाधानकारक पाणी असल्याने शेतकरी गहू, हरभरा या पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. सध्या खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन या पिकांच्या सोंगणीला पुन्हा वेग आला आहे. वाफसा अवस्था होताच शेतकऱ्यांची हळूहळू रब्बी हंगामातील कामांची तयारी सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा गहू पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती जाणवत असल्याने जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी घटली होती. हे पेरणी क्षेत्र ८४,३५८ हेक्टर इतकेच होते. यंदा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने कृषी विभागाच्या माहितीनुसार यंदा १ लाख ११ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर रब्बीतील पेरा प्रस्तावित केला आहे. यामध्ये सर्वाधिक गहू पिकाचे क्षेत्र तर हरभरा, मका, ज्वारीची पेरणी होणार आहे. त्यामध्ये निफाड, चांदवड, सिन्नर, येवला, मालेगाव, देवळा, सटाणा, कळवण या तालुक्यांत शेतकऱ्यांची कामे सुरू आहेत.

Rain
Rain Update : मंडळांनी ओलांडली पावसाची सरासरी

पुढील पंधरा दिवसांत या कामांना वेग येईल. मात्र करडई, सूर्यफूल या गळीत धान्य पिकांचे क्षेत्र शून्यावर आले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी कापणी करून शिवारात पडलेली पिके भिजल्याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नियोजित कामे लांबणीवर गेले आहेत. सिंचन सुविधा असल्याने शेतकऱ्यांकडून गहू पिकाला पसंती दिली जाणार असल्याचे चित्र आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात हळवी भात कापणीला सुरुवात होणार आहे.

खरीप पिकांचे शिवार कापणी करून पुढील रब्बी हंगामासाठी तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग काही ठिकाणी सुरू झाली आहे. सध्या गत सप्ताहात झालेल्या पावसामुळे जमिनीत पेरणीसाठी ओलावा निर्माण झालेला आहे. त्यामुळे संरक्षित सिंचनाखालील रब्बी हंगामातील पिकांची पेरणी वाढणार आहे. तर शेतकरी लेट खरीप व रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिका तयार करत आहेत. अनेक ठिकाणी अद्याप वाफसा स्थिती नसल्याने पुढे रब्बीची पेरणी होणार आहे. मात्र पूर्व भागातील येवला, नांदगाव, देवळा, सिन्नर व चांदवड तालुक्यात काही ठिकाणी अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे लवकर पेरणीची कामे सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार शेतकरी बाजारात हळूहळू बियाणे खरेदीसाठी येत आहेत.

Rain
Maharashtra Rain : दक्षिण महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

३६ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

यंदा पूर्व भाग वगळता जिल्ह्यात अनेक ठिकाणी समाधानकारक सिंचन सुविधा आहे. त्यामुळे रब्बी पेरा वाढणार आहे. त्यानुसार गरज लक्षात घेऊन ३६ हजार २१५ क्विंटल बियाणे मागणी नोंदविली आहे. खासगी क्षेत्राकडून सर्वाधिक २६९१२ तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय बियाणे महामंडळ व महाबीज यांच्याकडून ९,७०३ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यापैकी महाबीजकडून ८ हजार ६०३ क्विंटल, खासगी कंपन्यांकडून २६ हजार ५१२ क्विंटल अस बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

टप्प्याटप्प्याने होणार खताची उपलब्धता

कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ६३ हजार टन खतांची मागणी केली. तर कृषी आयुक्तालयाकडून २,७५ ६१४ टन खतांची मंजुरी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ३३ हजार ४०० टन, नोव्हेंबरमध्ये ४३ हजार ३०० टन, डिसेंबरमध्ये ५९ हजार २६९, तर जानेवारीत ५५ हजार ९२६ टन, फेब्रुवारीत ४० हजार ९८६ टन, मार्चमध्ये ४२ हजार ४१४ टन खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टर)

पीक गतवर्षीची पेरणी यंदाचे

प्रस्तावित क्षेत्र

गहू ४२,१८० ६३,३६५

ज्वारी ७,३०६ ६,१५०

मका ९,२८१ १०,१२५

हरभरा २५,५९२ ३२,१४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com