Farmers Protest : शेतकऱ्यांचे तीन ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन; काही गाड्या रद्द काही वळवल्या

Farmers' Rail Roko Protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्या आणि उसाच्या बिलावरून पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. आपल्या याच मागण्यांसाठी शेतकरी आज रेल्वे रोको आंदोलन करणार आहे.
Farmers' Rail Roko Protest
Farmers' Rail Roko ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : १३ फेब्रुवारीपासून हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करणारे शेतकरी आता आक्रमक झाले आहे. हरियाणा आणि पंजाबसह देशातील इतर ठिकाणी शेतकरी गुरूवार (ता. ३) रेल्वे रोको आंदोलन करणार आहे. यापार्श्वभूमिवर जालंधरमधील कँट स्टेशनवरून जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. यात शताब्दी आणि शान-ए-पंजाब रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. तर आंदोलनामुळे रेल्वेगाड्या तासनतास उशिरा धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराज आहे.

सध्या जालंधर कँट स्टेशनमध्ये काही कामे सुरू आहेत. यामुळे आधीच रेल्वे स्टेशन ब्लॉक केले आहे. यातच आज शेतकऱ्यांनी आज दुपारी रेल्वे रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. तर शेतकऱ्यांकडून फिल्लौर, लोहियां खास आणि जालंधर कँट रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या रोखल्या जाणार आहेत. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत रेल्वे रोको केला जाईल. यामुळे कँटमधून जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत. याचा फटका आता रेल्वे प्रवाशांना बसत आहे.

Farmers' Rail Roko Protest
Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी ३ ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन

दरम्यान आम्रपाली एक्सप्रेस १५७०७, अमृतसर जनसेवा एक्सप्रेस १४६१७, दुर्गियाना एक्सप्रेस १२३५७, मालवा एक्सप्रेस १२९१९, अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस २२४८७, अमृतसर एक्सप्रेस १४६३१ या गाड्या सुमारे चार ते पाच सात उशीरा धावत होती. तसेच सरयू यमना एक्सप्रेस १४६४९ देखील दीड ते दोन तास उशिरा पोहचली.

तसेच आजच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अमृतसर एक्सप्रेस ११०५७, पठाणकोट एक्सप्रेस २२४२९, शालिमार १४६६१, वेस्टर्न एक्सप्रेस १२९२५, उधमपूर एक्सप्रेस २२४३१ दीड तास उशिराने पोहोचल्या. तर स्वर्ण शताब्दी एक्सप्रेस १२०२९, शान-ए-पंजाब एक्सप्रेस १२४९७, लुधियाना छेहरता मेमू ०४५९१, अमृतसर एक्सप्रेस १४५०६ या गाड्या ९ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Farmers' Rail Roko Protest
Farmers' Protest : कंगनानंतर केंद्रीय मंत्री खट्टर यांचे शेतकरी आंदोलनावर भाष्य, म्हणाले, 'आंदोलनात बसलेले शेतकरी नाहीत, ते...'

शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय?

हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान मजदूर मोर्चाने रेल्वे रोकोची हाक दिली आहे. राज्याच्या विविध भागासह देशभरात दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत रेल्वे रोको केला जाईल. तर शेतकरी रेल्वे रुळावर आंदोलन सरकारचा निषेध करणार आहेत. यावेळी शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर, मनजीत सिंग आणि सतनाम सिंग साहनी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकरी उपस्थित असणार आहेत. फगवारा साखर कारखान्याने २०२१-२२ मधील हंगामाचे शेतकऱ्यांचे २८ कोटी रुपयांची देयके दिली नाहीत. तर नियमांनुसार जे देयक १४ दिवसांच्या आत द्यायचे असते. ते अद्याप दिलेले नाहीत. यामुळेच किसान मजदूर संघर्ष मोर्चा आणि बीकेयूच्या नेतृत्वात रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे.

शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी म्हणतात आमचा लढा...

दरम्यान शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे. तर आमचा लढा हा हमीभाव कायद्यासह लखीमपूरा घटनेतील मुख्य आरोपी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांचा मुलगा आशिष मोनू मिश्रा याला शिक्षा व्हावा यासाठी आहे. पंजाब व्यतिरिक्त हरियाणा, राजस्थान, यूपी, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये देखील रेल्वे करण्यात येईल, असेही पंढेर यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com