
Chh. Sambhajinagar News : एकाच वेळी पैसे भरल्यानंतर काहींनाच सोलर पंप बसून दिला गेला. काही शेतकऱ्यांना मात्र आज-उद्या म्हणता.. म्हणता सात महिन्याचा कालावधी लोटूनही सोलार पंपाची प्रतीक्षाच असल्याची स्थिती आहे. होत असलेल्या चालढकलीमुळे सोलार पंप बसणार तरी केव्हा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत पीएम कुसुम योजनेमधील हे सर्व लाभार्थी आहेत. विजेच्या प्रश्नावर पर्याय म्हणून शासनाने सोलार कृषी पंप योजना आणली. परंतु या योजनेत सोलार पंप बसवण्यासाठी होत असलेला विलंब शेतकऱ्यांना अत्यंत त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे योजनेचा होत असलेला गाजावाजा व प्रत्यक्ष स्थिती यामध्ये विसंगती आढळून येते आहे.
देवगाव येथील शेषराव ठोकळ, धर्मराज गिते, भाऊसाहेब खंड, मदन गिते, गहिनीनाथ गिते, भास्कर गिते, राजेंद्र ढाकणे, कडूबाई ठोकळ, अंकुश वाघमारे आदी शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेनुसार तीन व पाच एचपी क्षमतेच्या सोलार कृषी पंपासाठी सुमारे सात महिन्यांपूर्वी शेतकरी हिश्शाची अनुक्रमे १६ हजार ०३८ व २२ हजार ९७१ अशी रक्कम कॅटेगरीनुसार भरली.
आता सोलार कृषी पंप बसणार, आपली रात्रीच्या वेळी सिंचन करण्याची वेळ टळेल, असे शेतकऱ्यांना सोलर पंपसाठीचे पैसे भरल्यानंतर वाटले. परंतु महिना दोन महिने, चार महिने, सहा महिनेच नव्हे तर सात महिने उलटूनही त्यांच्या शेतात सोलार पंप बसलेच नाही.
सोलार पंप बसणार तरी केव्हा अशी विचारणा योजनेअंतर्गत निवडलेल्या सोलार कंपनीच्या प्रतिनिधीकडे केली असता आज येणार, उद्या येणार यापेक्षा कुठले उत्तर त्यांच्याकडून मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शासनाची योजना चांगली पण दिरंगाईने वेशीला टांगली अशीच काहीशी अवस्था योजनेची झाली, असल्याचे शेतकरी म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.