Strawberry Farming : पालघरमध्येही बहरणार स्ट्रॉबेरीचे मळे

Strawberry Cultivation : ग्रामीण भागासह आदिवासी समाजातील शेतकरी वर्गाचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. मात्र अनेक समस्यांवर मात करून जिल्ह्यातील शेतकरी विविध नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करीत आहेत.
Strawberry Farming
Strawberry Farming Agrowon
Published on
Updated on

Palghar News : ग्रामीण भागासह आदिवासी समाजातील शेतकरी वर्गाचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. मात्र अनेक समस्यांवर मात करून जिल्ह्यातील शेतकरी विविध नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करीत आहेत.

पाचगणी, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी लागवडीकडे जव्हार, मोखाडा तालुक्यासह डहाणू भागातील शेतकरी प्रायोगिक दृष्टिकोनातून वळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत होण्यास मदत होत आहे.

आदिवासी समाजातील बहुतेक नागरिक हे पावसाळ्यानंतर रोजगारासाठी स्थलांतर करतात. हाताला काम नसल्याने शेतकरी वर्ग रोजगारासाठी शहरांकडे जातो. आसनगाव येथील कृषी तंत्र विद्यालयामध्ये यंदा प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केल्यामुळे येथील रोजगार वाढून स्थलांतर संपुष्टात येण्यास मदत होईल.

Strawberry Farming
Strawberry Market : आश्रमशाळेतील मुलांना आहारात मिळणार स्ट्रॉबेरी ; स्ट्रॉबेरी विक्रीचा नवा फंडा

आता पालघरवासीयांना जिल्ह्यातच स्ट्रॉबेरीची लागवड करून घरच्या घरी खाण्यासाठी तसेच विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. या स्ट्रॉबेरीला वानगाव, डहाणू, बोईसर भागात मोठी मागणी असल्याने विक्री होत आहे. स्थानिक बाजारपेठेत प्रतिकिलो ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच रोजगार आणि उत्पन्न मिळू लागल्याने काही अंशी स्थलांतराला आळा बसला आहे.

Strawberry Farming
Strawberry Farming : केंजळेत फुलली लालचुटूक स्ट्रॉबेरी

उत्पादनाचा अंदाज

अधिक उत्पादनासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्ट्रॉबेरीची लागवड करावी. त्यामुळे डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरीला साधारणपणे ५०० ते ६०० रुपये प्रति किलोला भाव मिळतो. लागवड उशिरा झाल्यास फळ धारणेलाही उशीर होतो. त्या काळात ३०० रुपये प्रतिकिलो भाव मिळतो.

एका झाडाला साधारणपणे ७०० ते ८०० ग्रॅम फळे लागतात. एक फूट बाय एक फूट अंतरावर लागवड केली. सिंचनासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तण नियंत्रण आणि जमिनीत ओलावा टिकून राहावा, यासाठी मल्चिंग पेपरवर लागवड करण्यात आली.

स्ट्रॉबेरी पिकात पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. विद्यार्थ्यांना शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरी पिकासाठी बाजारपेठ आणि बाजारभाव या दोन्ही बाबी साध्य होत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून विकास साधावा.
- प्रवीण भोये, कृषितज्ज्ञ, कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com