Team Agrowon
भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली स्ट्रॉबेरी आता आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारात समाविष्ट करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने स्थानिक शेतकऱ्यांना चांगले दर मिळावेत आणि मुलांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
आदिवासी विकास विभागाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ५५ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे. यातून शेतकऱ्यांनी संपूर्ण संद्रिय स्ट्रॉबेरी पिकवली आहे.
प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना, ही स्ट्रॉबेरी आपण खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांच्या दैनंदिन आहारात देऊ अशी कल्पना सुचली.
त्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कळवून घोडेगाव येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात स्ट्रॉबेरी आणून द्या, या ठिकाणी वजन करून लगेच पैसे घेऊन जा, असे आवाहन केले.
याला बोरघर परिसरात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवषी २५ किलो स्ट्रॉबेरी जमा झाली. या ठिकाणी वजन करून २३० रुपये किलोप्रमाणे त्यांना पैसे देण्यात आले.
आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी मुलांच्या आहारात असावी आणि शेतकऱ्यांना जागेवरच चांगले दर मिळावे या उद्देशाने खरेदी केली.
याला शेतकरी देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन ही योजना सुरू करायला लावली व याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे,
Rose Market : व्हॅलेंटाइन डे, लग्नसराईमुळे गुलाबाची कळी खुलली ; गुलाबाच्या मागणीत मोठी वाढ