Farmers Diwali : शेतकऱ्यांची दिवाळी यंदा शेतातच

Paddy Harvesting : एकीकडे पावसाचे सावट आणि दुसरीकडे तोंडावर आलेल्या दिवाळीची तयारी अशा चक्रव्यूहात अडकलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी महिला उत्सवापेक्षा कापणीला तयार झालेले भात घरात आणण्यासाठी प्राधान्य देत आहे.
Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : एकीकडे पावसाचे सावट आणि दुसरीकडे तोंडावर आलेल्या दिवाळीची तयारी अशा चक्रव्यूहात अडकलेल्या ग्रामीण भागातील शेतकरी महिला उत्सवापेक्षा कापणीला तयार झालेले भात घरात आणण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी शेतातच जाणार हे निश्चित झाले आहे.

दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. यंदा अनियमित पावसाने कोकणातील भातशेतीला दणका दिला आहे. त्यामुळे सध्या भात कापणीत व्यग्र असलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर आधीच नुकसानीचे ओझे आहे. तरीही मिळेल त्यात समाधान मानण्याच्या शेतकऱ्यांच्या वृत्तीमुळे सध्या भात कापणीला जोर आला आहे.

Paddy Harvesting
Drought Crisis In Diwali : पीक-पाण्याशिवाय चैतन्य कुठून येणार?

कातळावरील शेतीची कामे मागील महिन्यात आटोपली होती. उरलेले शेतकरी सध्या भातकापणीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर भातकापणीला सुरुवात झाली. घरांमध्ये आलेले भात सुकविण्यासह त्याची सुरक्षितपणे साठवणूक करण्याच्या कामांची लगबग सुरू आहे.

त्याच्याजोडीने सुकविलेल्या गवताच्या उडव्या करण्यात येत आहेत. गेले दोन दिवस सतत पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे कापणी करून शेतामध्ये आडवे ठेवलेले भात पुन्हा सुकवावे लागले. निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकरी दिवस-रात्र शेतीच्या कामात व्यग्र झाला आहे.

Paddy Harvesting
Diwali Festival : खरा संदेश धनत्रयोदशीचा!

भातशेतीच्या कामांची ही लगबग अजून आठ ते दहा दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. एका बाजूला सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू असली तरी, भातकापणीचीही लगबग असल्याने शेतकऱ्यांची या वर्षीची दिवाळी शेतावरच साजरी होणार आहे.

महिलांची कसरत

भातशेतीची कामे सुरू असल्यामुळे दिवाळीचा फराळ करण्यासाठी महिलांना वेळ काढणे शक्य होत नाही. तरीही दिवसभर शेतात राबणारी शेतकरी महिला रात्री उशिरापर्यंत जागून करंजा, चिवडा, लाडू बनवण्याची कसरत करत आहे.

याबाबत राजापूर येथील भागिर्थी शिंदे म्हणाल्या, ‘‘दिवाळी सण मोठा असला तरी भातपीक आमची वर्षभराची बेगमी आहे. त्यामुळे ते पहिले हाती घेणार आणि शेतामध्ये राबत दिवाळी साजरी करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com