Seed Scam: बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारचे कारवाईचे आश्वासन 

Agriculture Fraud: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज (ता.१५) बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावर कारवाईची मागणी यावर जोरदार चर्चा झाली.
Seed Scam
Seed ScamAgrowon
Published on
Updated on

Bogus Seeds: महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज (ता.१५) बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावर कारवाईची मागणी यावर जोरदार चर्चा झाली. आमदार राजेश बकाने यांनी वरुण सिड्स आणि सोनम सिड्स या कंपन्यांनी पुरवलेल्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.

यासोबतच, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही त्यांनी केली. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोषी कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्याचे आणि नवीन मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आश्वासन दिले.

Seed Scam
HTBT Seed Scam: अनधिकृत बियाण्यांविरोधात कृषी सेवा केंद्रधारकांचा एल्गार

आमदार बकाने यांनी आपल्या मागणीत म्हटले की, वरुण सिड्स आणि सोनम सिड्स, हैदराबाद या दोन बियाणे कंपन्यांना तातडीने ब्लॅक लिस्ट करावे. या कंपन्यांनी निकृष्ट दर्जाची बियाणे पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. यासोबतच, या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कृषी अधिकारी तोटावार यांना त्वरित निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. 

Seed Scam
Cotton Seed Scam : कापसाचे बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

या मुद्द्यावर शासनातर्फे उत्तर देताना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला माहिती दिली की, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात कृषी विभागाची साडेतीन तासांची सविस्तर बैठक झाली. या बैठकीत वरुण सिड्स आणि सोनम सिड्स या कंपन्यांच्या बियाण्यांबाबत काही गंभीर त्रुटी आढळून आल्या.

बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असता, सहापैकी पाच बियाणे उगवण्यास अक्षम असल्याचे स्पष्ट झाले. यावरून या कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.राज्यमंत्री जयस्वाल यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, सरकार अशा फसव्या कंपन्यांना माफ करणार नाही. या दोन्ही कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

याशिवाय, शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सभागृहाला पुढील आश्वासन दिले की, विधिमंडळातील कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांची एक विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती पुढील तीन महिन्यांत बियाणे गुणवत्ता नियंत्रणासाठी नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करेल आणि ती सभागृहासमोर सादर करेल.

कृषी अधिकारी तोटावार यांच्या निलंबनाच्या मागणीवरही सभागृहात जोरदार चर्चा झाली.यावर राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com