HTBT Seed Scam: अनधिकृत बियाण्यांविरोधात कृषी सेवा केंद्रधारकांचा एल्गार

Farmer Rights: बेकायदा व बोगस एचटीबिटी बियाणे पुरवठा व त्याआड अनधिकृतपणे कीटकनाशक व खतांची विक्री यामुळे परवानाधारक कृषी सेवा केंद्र व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
HTBT Seed Scam
HTBT Seed ScamAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: बेकायदा व बोगस एचटीबिटी बियाणे पुरवठा व त्याआड अनधिकृतपणे कीटकनाशक व खतांची विक्री यामुळे परवानाधारक कृषी सेवा केंद्र व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम झाल्याने याला विरोध म्हणून नागपूर डिस्ट्रिक ॲग्रो डिलर्सच्या वतीने सोमवारी (ता.३०) बंदची हाक देण्यात आली आहे.

नागपूर डिस्ट्रीक ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारकडून तणाला प्रतिकारक (एचटीबिटी) बियाण्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र त्यानंतरही गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांत एचटीबिटी असल्याचे भासवत थेट प्रक्रिया केलेल्या सरकीचे पॅकिंग करून त्याची बियाणे म्हणून विक्री केली जात आहे.

HTBT Seed Scam
HTBT Seed Fraud: ‘एचटीबीटी’आड बाजारात एफ-२ बियाण्यांची विक्री

या बियाण्यांची लागवड केल्यावर थेट तणनाशकाची फवारणी करता येते व मजुरांच्या माध्यमातून होणाऱ्या तणनियंत्रणावरील खर्च वाचतो, असा प्रसार काहींकडून मुद्दाम केला जातो. या भुलथापांना बळी पडत शेतकरी या अनधिकृत बियाण्यांची लागवड करतात आणि थेट तणनाशक फवारतात. परंतु हे बियाणे तणाला प्रतिकारक नसल्याने कधी उगवत नाही, तर कधी तणनाशक फवारल्याने करपून जाते.

HTBT Seed Scam
HTBT Cotton Seed : कपाशीचे एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी जिंतूर तालुक्यात गुन्हा

मात्र बियाणे खरेदीचा सर्व व्यवहार अनधिकृत व बेकायदेशीर असल्याने अशा प्रकरणात शेतकऱ्याला शासनस्तरावर दादही मागता येत नाही. यातून आर्थिक विवंचना सोबतच कर्जबाजारीपणातून आत्महत्या देखील वाढतात, असा आरोप कृषी सेवा केंद्रधारकांनी केला आहे.

कृषी सेवा केंद्रधारक परवाना घेऊन जीएसटी, आयकराचा भरणा करतात. त्यासोबतच शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालनही त्यांच्यावर सक्‍तीचे राहते मात्र अवैध विक्रेत्यांवर शासनाचा कोणताच वचक नाही. लिंकिंग प्रकरणात देखील कृषी सेवा केंद्रधारकांनाच टार्गेट केले जाते; खरी कारवाई कंपन्यांवर अपेक्षीत आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अभिजित काशीकर, सचिव डॉ. विजय चांडके उपाध्यक्ष नितीन भोयर, कोशाध्यक्ष विजय लोहिया यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com