Nadir Godrej : शेतकरी हे आपले सामर्थ्य, त्यांना सर्वतोपरी मदत करावी

Godrej Industries Chairman N. B. Godrej : ‘‘शेतकरी हे आपल्या देशाचे सामर्थ्य आहे आणि यापुढे आपण त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे.’’ असे प्रतिपादन गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एन. बी. गोदरेज यांनी केले.
Godrej Industries Chairman N. B. Godrej
Godrej Industries Chairman N. B. GodrejAgrowon

Mumbai News : ‘‘शेतकरी हे आपल्या देशाचे सामर्थ्य आहे आणि यापुढे आपण त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे. सरकारच्या सक्रिय सहकार्याने कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय सुधारणा होईल,’’ असे प्रतिपादन गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एन. बी. गोदरेज यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने कृषी, फलोत्पादन, सिंचन आणि सौरऊर्जा परिषद मुंबईत घेण्यात आली. या वेळी श्री. गोदरेज यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेत सर्व संबंधित समस्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल उपस्थित होते.

Godrej Industries Chairman N. B. Godrej
Civil Service Board : नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी गोपनीय नको

आरएन फॉस्फेट्स आणि केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. ‘नाबार्ड’चे महाव्यवस्थापक एम. के. डे, ‘आयसीएआर’चे राजा सुब्रम्हण्यम, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे अमित खोंबडिया. ईस्टर्न कार्गो सप्लाय चेनचे संचालक विनीत खन्ना, आधार हाउसिंग फायनान्सचे मयंक भटनागर यांनी सादरीकरण केले. या वेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या गावांचाही सत्कार करण्यात आला.

श्री. मोकल म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकऱ्यांनी कोरगोटेड बॉक्समध्ये अल्फान्सो आंब्याचे पॅकेजिंग सुरू करून निर्यात केल्याने अधिकाधिक मागणी होऊ लागली आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून मोठे हवामान बदल होत आहेत. आंबा उत्पादनात ५० ते ६० टक्के घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हाने आहेत.

Godrej Industries Chairman N. B. Godrej
Cotton Crop : कापूस पिकावर होणार नागपुरात मंथन

१९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या देशासाठी खुले आर्थिक धोरण स्वीकारले. याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेती, फलोत्पादन उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी झाला. सिमला, काश्मीरमधून मुंबईत आलेल्या सफरचंदांच्या पॅकेजिंगचा दर्जा सुधारण्यास मदत झाली.

पूर्वी सफरचंद लाकडी बॉक्समध्ये पॅक केले जात होते. परंतु खुल्या अर्थव्यवस्थेमुळे ते कोरोगेटेड बॉक्समध्ये पॅक केले जाऊ लागले. आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कोरोगेटेड बॉक्समध्ये अल्फोन्सो आंब्याचे पॅकेजिंग सुरू केले. त्यांची निर्यात करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्फोन्सो आंब्याच्या निर्यातीच्या अधिकाधिक ऑर्डर मिळाल्या.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com