Pune News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा मदत निधी बंदच्या वृत्ताचे खंडण राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत करण्यात आले. गुरूवारी (ता.५) झालेल्या बैठकीत पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यासह विविध महत्वाच्या १० हून अधिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि सरकारमधील इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्राँकायटिसची लागण झाल्याने ते ऑनलाईन हजर होते.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा मदत निधी बंदच्या वृत्ताने सरकारवर सकाळपासून टीकेची झोड उठली होती. तर याबाबत महसूल व वन विभागाने मंगळवारी (ता. ३) शासन निर्णय काढला होता. ज्यात राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याचे म्हटले होते. ज्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. यावरून आजच्या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा मदत निधी बंदच्या वृत्ताचे सरकारने खंडन केले.
तसेच ही योजना सुरूच राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावेळी यांनी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. ज्यात आतापर्यंत राज्यभरात १.६० लाख लाभार्थी महिलांना ४ हजार ७८७ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
१) पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
२) अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
३) धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
४) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
५) शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
६) अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार
७) औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
८) थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
९) काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय
१०)पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
११) लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. आतापर्यंत राज्यभरात १.६० लाख लाभार्थी महिलांना ४ हजार ७८७ कोटी रूपयांचे वाटप
१२) राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
१३) हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.