Satej Patil and Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी शब्द पाळावा अन्यथा..., गाय दूध दर कपातीवरून शेतकरी आक्रमक

Gokul Dudh Sangh : मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये निवडून द्या, तुम्हास पाच रुपये दरवाढ देऊन व वासाच्या दुधाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते.
Satej Patil and Hasan Mushrif
Satej Patil and Hasan Mushrifagrowon
Published on
Updated on

Kolhapur Gokul Milk Rate : १ ऑक्टोबर २०२३ पासून गोकुळने दोन रुपयांची कपात केली. यावर कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक गोकुळने दूध दरात केलेल्या कपातीवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. गोकुळने मागच्या तीन महिन्यात चार रुपयांची कपात केल्याने दूध उत्पादक शेतकरी आता गोकुळविरोधात थेट रस्त्यावर आला आहे.

भुदरगड तालुक्यातील दूध उत्पादकांनी बसस्थानक परिसरात आंदोलन करत 'गोकुळ आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं', दूध दरवाढ झालीच पाहिजे' अशा घोषणा दिल्या.

Satej Patil and Hasan Mushrif
Gokul Milk : आम्हाला 'अमूल'सारखे पर्याय, 'गोकुळ'कडून जखमेवर मीठ चोळण्याचे काम

गोकुळ दूध संघाने ११ ऑक्टोबरपूर्वी गाय दूध दरात केलेली कपात रद्द करावी, अन्यथा गोकुळ सेंटरसह भुदरगड तालुक्यातील संचालकांच्या घरावर गाई-म्हशींचा मोर्चा काढू, असा इशारा दूध उत्पादकांनी दिला. याप्रश्नी दूध उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी प्रा. जालंदर पाटील यांनी दूध संघ पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावले.

याचबरोबर राधानगरी तालुक्यातील तिटवे गावातील शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाने गाय दुधात चार रुपये दर कमी केल्याबद्दल चक्रेश्वर देवालयामध्ये निषेध सभा घेतली. लम्पी आजाराने गाय दूध उत्पादक अगोदरच हैराण आहे.

पशुखाद्य, वैद्यकीय सेवा, ओला-सुका चारा, मजुरी यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकास चार रुपये दरवाढ मिळावी, अशी मागणी गाय दूध उत्पादकांनी केली.

मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी आमच्या पॅनेलला निवडून द्या. तुम्हास पाच रुपये दरवाढ देऊन व वासाच्या दुधाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे.

दूध उत्पादक जर नाराज झाला तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. नेतेमंडळींनी गांभिर्याने दखल घ्यावी व उत्पादकांना न्याय द्यावा, असा इशारा दिला.

सभेत संभाजीराव देसाई, प्रकाश पवार, बापू किल्लेदार, विकास घारे, शरद किल्लेदार यांची भाषणे झाली. सभेस दीपक किल्लेदार, शिवाजी नांगरे, पांडुरंग चौगले, सुनील पाटील, आनंदा बराडे, मारुती देसाई, अशोक चौगले, प्रवीण किल्लेदार, सुनील घारे, पांडुरंग गुरव तसेच दूध संस्थांचे चेअरमन, सेक्रेटरी, संचालक, दूध उत्पादक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com