Cow Milk Rate : गाय दूध दर कपातीवरून शेतकरी आक्रमक, 'गोकुळ'च्या दारात उपोषण करण्याचा इशारा

Cow Milk Rate Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी गायीच्या दूध दरात ३ रूपये कपात केली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
Cow Milk Rate
Cow Milk Rateagrowon
Published on
Updated on

Gokul Cow Milk Rate : पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी गायीच्या दूध दरात ३ रूपये कपात केली आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. गोकुळ दूध संघाने केलेली कपात मागे घ्यावी अन्यथा संघाच्या दारात उपोषण करणार असल्याचा इशारा विविध संघटना आणि पशुपालकांच्या शिष्टमंडळाने संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांना गुरूवार (ता.०५) निवेदन दिले.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ दूध संघाने यापूर्वी २ वेळा गाय दूध खरेदी दरात कपात केली आहे. पुन्हा २१ नोव्हेंबरला खरेदी दरात ३ रुपयांची कपात केली. पशुपालक आधीच लॉकडाऊन, लम्पी, अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पशुपालन व्यवसाय सुरळीत सुरू असताना अचानक संघाने दूध खरेदी दरात कपात करून पशुपालकांना अडचणीत आणले आहे. पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच वारंवार दूध खरेदी कपात केली जात आहे.

Cow Milk Rate
Sugar Extraction Kolhapur : साखर उताऱ्यात कोल्हापूरची राज्यात आघाडी, तर अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वात कमी उतारा

पशुपालन व्यवसायासाठी युवा पिढीला चालना देणे गरजेचे असताना दूध खरेदी दरात कपात करून हा व्यवसाय अडचणीत आणला जात आहे. यामुळे दूध दरावर लवकर निर्णय घ्यावा अन्यथा उपोषण करणार असल्याची माहिती निवेदनात दिली आहे.

यावेळी 'गोकुळ'चे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांच्यासह जोतिराम घोडके, सचिन शिंदे, पंडित पोवार, भिवाजी पोवार, महादेव चौगुले, बाबासाहेब माने, अमरसिंह रजपूत, सातू चव्हाण, सुरेश हांडे, ऋषीकेश पवार, पांडुरंग पाटील आदी पशुपालक उपस्थित होते.

कपात मागे घ्या अन्यथा आंदोलन : विलास नाळे

दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपयांची कपात केली आहे. ही कपात शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर तातडीने दरात कपात करून दूध संघांनी शेतकऱ्यांच्या मानेवर पाय दिला आहे. ही कपात मागे घेऊन पूर्ववत दर द्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सांगरूळ (ता. करवीर) येथील दत्त दूध संस्थेचे अध्यक्ष विलास नाळे यांनी पत्रकातून दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com