Sugar Extraction Kolhapur : साखर उताऱ्यात कोल्हापूरची राज्यात आघाडी, तर अहिल्यानगर जिल्ह्याचा सर्वात कमी उतारा

Kolhapur Sugarcane : विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेला कोल्हापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला आहे. साखर उताऱ्यामध्ये राज्यात कोल्हापूर आघाडीवर असून सध्या ८.१५ टक्के साखर उतारा मिळत आहे.
Sugar Production
Sugar Productionagrowon
Published on
Updated on

Sugarcane Season Maharashtra : विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेला कोल्हापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला आहे. साखर उताऱ्यामध्ये राज्यात कोल्हापूर आघाडीवर असून सध्या ८.१५ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे (वारणानगर), कुंभी- कासारी (कुडित्रे), दत्त दालमिया (आसुर्ले-पोर्ले), जवाहर शेतकरी (हुपरी) या साखर कारखान्यांचा उतारा १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

जिल्ह्यात उसाला पोषक वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा साखर उताऱ्यावर परिणाम होतो. जेवढी जास्त थंडी असेल तेवढे उसातील साखर प्रमाण वाढत असते. त्यामुळे चांगल्या आणि पोषक वातावरणामुळे प्रत्येक वर्षी कोल्हापूर जिल्हा साखर उताऱ्यात अग्रेसर राहिला आहे.

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सध्या ८.१५ टक्के साखर उतारा आहे. याउलट सर्वांत कमी ६.३२ टक्के साखर उतारा अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. पुणे जिल्ह्याचा सध्या ७.४५ टक्के, सोलापूर ६.६४ टक्के, छत्रपती संभाजीनगर ६.५४ टक्के, नांदेड ६.७७ टक्के व अमरावती ६.७६ टक्के उतारा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त दालमिया, कुंभी- कासारी, जवाहर शेतकरी, तात्यासाहेब कोरे कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या साखर उताऱ्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी २३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ११.४ टक्क्यांपर्यंत होता. साखर उतारा जेवढा वाढेल तेवढा शेतकऱ्यांना दर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यांचा साखर उतारा महत्त्वाचा वाटतो.

Sugar Production
Sugarcane Season 2024 : कोल्हापुरात ऊस हंगाम सुरू; पूर्व भागात दबकत तोडणी

असा मोजला जातो साखर उतारा ...

एक टन उसापासून मिळणाऱ्या साखरेवरून साखरेचा उतारा निश्‍चित केला जातो. उदाहरणार्थ एक टन म्हणजे १००० किलो ऊस गाळप केल्यास १०० किलो साखर मिळाली, तर या ठिकाणी साखरेचा उतारा हा १० टक्के धरला जातो. तसेच, एक टन उसापासून ९०० किलो साखर निर्मिती झाल्यास ९ टक्के साखर उतारा मिळाला, असे समजले जाते.

एक डिसेंबर २०२३ ला असणारा साखर उतारा

तात्यासाहेब कोरे (वारणानगर) १०.२८, रेणुका शुगर (गंगानगर) उपलब्ध नाही, कुंभी-कासारी (कुडित्रे) १०.०९, दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) उपलब्ध नाही, भोगावती (परिते) उपलब्ध नाही, दत्त शेतकरी (शिरोळ) ८.५५, अथर्व (दौलत, हलकर्णी) उपलब्ध नाही, आप्पासाहेब नलवडे (हरळी) उपलब्ध नाही, छत्रपती शाहू (कागल) ५.४६, जवाहर सहकारी साखर, कल्लाप्पा आवाडे (हुपरी) १०.०२, छत्रपती राजाराम (कसबा बावडा) ९.८१, आजरा शेतकरी (गवसे) ९.९, अथणी शुगर्स (बांबवडे) ९.६४, सदाशिवराव मंडलिक (कागल) उपलब्ध नाही, शरद (नरंदे) उपलब्ध नाही, डॉ. डी. वाय. पाटील (पळसंबे) ८.५६, अथणी शुगर (तांबाळे) ९.६, दालमिया (आसुर्ले-पोर्ले) १०.५६, गुरुदत्त शुगर (टाकळीवाडी) उपलब्ध नाही, इको केन (म्हाळुंगे) ९.८१, संताजी घोरपडे (बेलवडे काळम्मा) ८.६, ओलम ग्लोबल (राजगोळी) ८.२५, रिलायबल शुगर (फराळे) उपलब्ध नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com