Onion Export Ban : कांद्याचे दर घसरल्याने जिल्ह्यात शेतकरी आक्रमक

Onion Ban Export : केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी व कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक कोंडी करणारा ठरत असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
Onion Rate Issue
Onion Rate IssueAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारने ग्राहकांच्या हितासाठी व कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक कोंडी करणारा ठरत असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

यावरून जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही ठिकाणी लिलाव बंद पाडण्यासह रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांनी कांदा दरातील घसरणीवरून सरकारचा निषेध केला.

Onion Rate Issue
Onion Rate : निर्यातबंदीनंतर कांदा बाजारात काय घडतंय?

मनमाड (ता. नांदगाव) येथे बुधवारी (ता. १३) मनमाडमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांनी इंदूर-पुणे महामार्गावरील मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत न्याय मिळावा, अशी मागणी केली. ‘नाफेड’ आणि ‘एन.सी.सी.एफ’ने शेतकऱ्यांचा कांदा क्विटंलला तीन हजार रुपये भावाने सरसकट व थेट शेतकऱ्यांकडून करावी, अशीही मागणी करण्यात आली.

सरकारने ‘नाफेड’द्वारे मनमाड बाजार समितीत कांदा खरेदी करावा, यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संतप्त झाले होते. मनमाडला सरासरी ५०० ते १,२०० रुपये भाव मिळाला तर झोडगे उपबाजारात ५०० ते ७०० रुपये भाव मिळाल्याने संतप्त कांदा उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

Onion Rate Issue
Onion rate : केंद्र पथकाच्या अहवालाने केला कांदा उत्पादकांचा घात!

पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा लिलाव सुरू केले. त्या वेळी क्विटंलला १,९०० रुपये भाव मिळाला. त्याचबरोबर नांदगाव बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव रोखत येवला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जळगाव बुद्रुकचे नवनाथ कांदे यांच्या नेतृत्वाखाली लिलाव बंद पाडण्यात आले. चौधरी यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार, बाबासाहेब साठे यांना बोलावून घेऊन खैरनार यांच्या दालनात चर्चा केली. त्यानंतर लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com