Milk powder Import
Milk powder ImportAgrowon

Milk Powder Import : दूध भुकटी आयातीवरून शेतकऱ्यांत संताप

Dairy Import : सोलापूर जिल्हा दूध उत्पादनातील आघाडीवरचा जिल्हा आहे. जिल्ह्यात जिल्हा दूध संघ, शिवामृत दूध संघ या दोन सहकारी दूध संघाशिवाय सहा ते आठ खासगी दूध संघांमार्फत दूध संकलन होते.
Published on

Solapur News : जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या आधीच गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ ते २६ रुपये इतका कमी दर मिळत असताना, आता केंद्र शासनाने १० हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना बसणार आहे. सरकारच्या या धोरणावर दूध उत्पादकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

सोलापूर जिल्हा दूध उत्पादनातील आघाडीवरचा जिल्हा आहे. जिल्ह्यात जिल्हा दूध संघ, शिवामृत दूध संघ या दोन सहकारी दूध संघाशिवाय सहा ते आठ खासगी दूध संघांमार्फत दूध संकलन होते. रोज साधारण दीड लाख लिटरपर्यंतचे संकलन जिल्ह्यात होते. त्यात सर्वाधिक गाईच्या दुधाचा समावेश आहे.

Milk powder Import
Milk Powder Import : दूध भुकटी आयातीला पायघड्या

जिल्ह्यात जवळपास १२ लाख ४१ हजार ८५८ लहान-मोठी जनावरे आहेत. त्यात दुभत्या जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. या जनावरांचा विचार करता दिवसाला २० हजार टन चारा लागतो आहे. एकीकडे कमी पावसामुळे चाऱ्याची वाणवा आहे. तर दुसरीकडे पशुखाद्याच्या वाढत्या दराने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

विशेषतः दुभत्या जनावरांच्या दुधावर त्याचा परिणाम झाला आहे. पशुखाद्य, चारा यावरील वाढता खर्च आणि मिळणारा २५-२६ रुपयांचा दर याचा मेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यातूनही कसाबसा व्यवसाय टिकवून ठेवला असताना, आता सरकारने दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Milk powder Import
Milk Powder Import : दूध संघाबरोबर उत्पादकांचेही अर्थकारण बिघडणार
पशुखाद्याचे वाढते दर आणि मिळणारा दर याचा मेळ बसत नाही, तरीही आम्ही कसाबसा व्यवसाय करतो, पण कोणतीही गरज नसताना, सरकार चुकीची धोरणे राबवत आहे, दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे.
- शंकर साठे, दूध उत्पादक, बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर
दुधाला दर वाढविण्याच्या उपाययोजना करण्याऐवजी दूध व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. दूध भुकटीच्या आयातीचा निर्णय तातडीने रद्द करावा आणि दूध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे, अन्यथा आम्ही १ जुलैपासून आंदोलन करणार आहोत.
- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com