Nashik News : राज्यात शनिवारी अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा उद्धवस्थ झाल्या आहेत. कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली. तसेच प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले.
द्राक्ष उत्पादक शेतकरी महिलेचे आश्रु अनावर झाले. या पावसाने सर्व होत्याचं नव्हतं करून ठेवलंय, आता सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं? कोण समजून घेणार, मंत्री आले आणि बांधावरूनच निघून गेले, अशी व्यथा सांगितली.
नाशिकमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त अनावर झाला. त्यांनी तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करा, अशी मागणी केली.
भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कृषी विभागाला नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील चांदवड, निफाड भागात कांदा आणि द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले. द्राक्ष बाग मणी भरण्याच्या अवस्थेत असतानाच अवकाळीचा तडाका बसला आहे. तसेच आदिवासी भागात देखील कापणीला आलेले भात पीक आणि काढून ठेवलेले भात पीक याचे नुकसान झाले.त्याचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिली. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्राप्त झाल्यावर शासनाला कळवला जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.