

Chh. Sambhajinagar News : शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान व माहितीची पर्वणी घेऊन आलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्स्पो-२५’ कृषी प्रदर्शनाला रविवारी (ता. १२) तिसऱ्या दिवशीदेखील उदंड प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी व शेती संलग्न उद्योगातील प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट दिली. या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (ता.१३) शेवटचा दिवस आहे.
लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत मार्गदर्शक ठरलेल्या या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘अॅग्रीकॉन न्यूट्रिटेक लिमिटेड’ आहेत. तर सहप्रायोजक म्हणून एन्जोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज (नाशिक), पवन अॅग्रो, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, बी. जी. चितळे डेअरी (भिलवडी, जि. सांगली), आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा), महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण-मेडा (महाऊर्जा), महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी) या संस्था सहभागी झाल्या आहेत.
प्रदर्शनाचे गिफ्ट स्पॉन्सरर्स रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) व इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) आहेत. प्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडच्या केंब्रिज स्कूलजवळील श्रीराम मंदिर ट्रस्टचे मैदान गजबजले आहे. रविवार असल्यामुळे शहरवासीय सहकुटुंब प्रदर्शनस्थळी येत होते.
कृषी प्रदर्शनात आयोजिलेल्या जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्याचे कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी आज आवर्जून प्रदर्शनाला भेट दिली. तसेच विविध दालनांना भेटी देत शेतकरी व कृषी उद्योजकांशी संवाद साधला.
या कृषी प्रदर्शनाद्वारे यांत्रिकीकरण, बागायती शेतीमधील संधी, कोरडवाहू शेतीमधील समस्यांवरील उपाय तसेच संरक्षित शेतीमधील नव्या वाटा दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ट्रॅक्टरसह अवजारांची धुमधडाक्यात खरेदी
‘अॅग्री एक्स्पो-२५’मध्ये काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह अनेक किमती अवजारांची खरेदी केली. प्रदर्शनाच्या माध्यमातून तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. तसेच प्रदर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या हजारो प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीचा विचार करीत काही कंपन्यांनी आपल्या नव्या उत्पादनाचे वाजतगाजत ‘लाँचिंग’ केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.