Agri Expo 2025 : शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल विक्रीला प्रतिसाद

Agrowon Exhibition : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि सकाळ-अॅग्रोवन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कृषी व धान्य महोत्सवातील दालनावरुन शेतीमालाची शेतकरी ते ग्राहक अशी थेट शेतमाल विक्री होत आहे.
Agri Expo 2025
Agri Expo 2025 Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि सकाळ-अॅग्रोवन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कृषी व धान्य महोत्सवातील दालनावरुन शेतीमालाची शेतकरी ते ग्राहक अशी थेट शेतमाल विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या दर्जेदार शेतीमाल खरेदीसाठी ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे.

कृषी प्रदर्शनात छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया सूक्ष्मउद्योग अंतर्गंत वैयक्तिक लाभार्थी आदीचे स्टॉल्स आहेत.

या महोत्सवामध्ये ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मटकी, जवस, कुळीथ अशा विविध प्रकारच्या डाळी, आवळा, अंबाडी, सरबत, हळकुंड, हळद पावडर, रोस्टेड सोयाबीन, तसेच करडी पेंड, करडई, शेंगातेल आदी प्रक्रिया उत्पादनांची विक्री होत आहे.

Agri Expo 2025
Agri Expo 2025 : रोहित कृषी, पितांबरी आणि चितळे डेअरीच्या नव्या उत्पादने; शेतकऱ्यांचे लक्ष वेधताहेत!"

आत्माच्या दालनावर शेतकऱ्यांनी पिकविलेल्या दर्जेदार ब्रोकोली, टोमॅटो आदी भाजीपाला, केळी, कवठ, मोसंबी फळे मांडण्यात आली आहेत. या धान्य महोत्सवाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी उच्चप्रतीचे धान्य, प्रक्रिया उत्पादनाच्या खरेदीसाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांची झुंबड उडाली

शेतकरी गटाच्या स्टॉलवर मध तर बळीराजा गटाने काळ्या मनुका, अंजीर, काजू, आक्रोड, खजूर या सुका मेव्यासह आंबा बर्फीचे दालन थाटले आहे. ताडहादगाव येथील बचत गटाच्या दालनावरील मेंढी लोकर पासून बनविलेल्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या घोंगड्या, आसन पट्ट्या, उश्या आदींचा समावेश आहे.

Agri Expo 2025
Agri Expo 2025 : ‘अॅग्री एक्स्पो-२५’मध्ये दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी

त्याच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल आहे. याबाबत बिडकीन येथील कृषी समर्पण फार्मर प्रोड्युसर्स कंपनीचे प्रल्हाद बोडखे म्हणाले, गूळ, गूळ मलाई, विविध फ्लेवरचे गूळ क्यूब, काकवी आदीची चांगली विक्री सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. तर कुंभेफळ येथील जय जवान शेतकरी गटाचे अनिल शेळके यांनी दूध, दही, श्रीखंड, लस्सी, तूप, कुल्फी आदी उत्पादनास ग्राहकांची पसंती असल्याचे सांगितले.

शून्य मशागत तंत्र दालनात रेलचेल

शून्य मशागत शेती तंत्र तसेच जैविक शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणारी दालने ही या महोत्सवाचे वैशिष्टय ठरली आहे. या दालनात शेतकरी आवर्जून थांबून शून्य मशागत शेती तंत्रासह जैविक शेतीबाबत माहिती घेत आहेत. दिवसभर शेतकऱ्यांची या दालनामध्ये रेलचेल दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com