
Pune News: अखिल भारतीय कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेची अधिकृत स्थापना नुकतीच कामगार संघटना कायदा १९२६ अंतर्गत मुंबई येथील कामगार आयुक्तालय येथे झाली. ही संघटना संपूर्ण भारतातील अशासकीय संस्थांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रांमधील (केव्हीके) कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणार आहे.
या संघटनेच्या अध्यक्षपदी हिंगोली येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांची एकमताने निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. के. पी. सिंग आणि डॉ. विलास जाधव यांची निवड झाली, तर पुणे येथील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. राहुल घाडगे यांची सचिवपदी आणि डॉ. प्रशांत शेटे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेच्या सहसचिवपदी डॉ. निलम राव, संतोष देशमुख आणि सहकोषाध्यक्ष म्हणून डॉ. विकास जाधव यांची निवड झाली. या संघटनेच्या कार्यकारी सदस्यपदी डॉ. धनलक्ष्मी, डॉ. व्यंकट शिंदे आणि डॉ. राजेंद्र वावरे यांची निवड करण्यात आली. या वेळी संघटनेच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान लातूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन डिग्रेसे उपस्थित होते. या संघटनेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांतील केव्हीके कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
केव्हीके नेटवर्कद्वारे कृषी विस्तार आणि संशोधनासाठी समर्पित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने ही स्थापना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट केव्हीके कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती धोरण, समान वेतन, वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्ते व अनुषंगिक लाभ, सेवानिवृत्तीनंतरचे फायदे, ‘एक केव्हीके एक धोरण’ ची प्रभावी अंमलबजावणी आणि संपूर्ण केव्हीके समुदायाच्या कल्याणासाठी केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा करणे आहे.
या संघटनेमध्ये अटारी निहाय ११ विभागीय स्तरावर समन्वयक असतील आणि ते राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून कर्मचाऱ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तसेच संघटनेच्या सदस्य वाढीसाठी आणि विस्तारासाठी कार्यरत राहतील. नवनिर्वाचित संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. पी. शेळके यांनी सांगितले की, आम्ही भारतातील सर्व केव्हीके कर्मचाऱ्यांच्या कल्याण आणि हक्कांसाठी लढा देऊ. ही संघटना आमच्या सामूहिक शक्तीचे आणि आमच्या न्याय हक्कांसाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
अखिल भारतीय कृषी विज्ञान केंद्र संघ सर्व केव्हीके कर्मचाऱ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी आणि भारतातील कृषी क्षेत्राला अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करण्यास कटिबद्ध आहे. या संघटनेचे सदस्य होण्यासाठी भारतातील अशासकीय संस्थेतील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. संघटना स्थापन करण्यासाठी डॉ. उमेश ठाकरे, डॉ. सचिन डिग्रसे, डॉ. अतुल कळसकर, डॉ. कौशिक, डॉ. रवींद्र काळे, डॉ. लालासाहेब तांबाडे, डॉ. सी. पी. रॉबर्ट, डॉ. रवींद्र सिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.