Land Acquisition Compensation : भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना त्रास नको

Land Acquisition : सरकारच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासोबतच विविध प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घेऊन यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
Land Acquisition
Land Acquisition Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

धाराशिव : सरकारच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासोबतच विविध प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घेऊन यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातआयोजित विविध विभागाच्या आढावा सभेत ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक खंडेराव उपस्थित होते. जिल्हास्तरीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत स्तरावर विविध योजना प्रकल्प व अभियानाची प्रभावी अंमलबजावणीसाठी थेट सरपंच व सचिवांशी समन्वय साधून संपर्कात राहावे.

Land Acquisition
Land Acquisition Compensation : शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम भूसंपादन विभागाच्या खात्यात

विशेषतः वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन काम करावे. सौर कृषी वाहिनी प्रकल्प वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनसाठी विविध ठिकाणी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहण करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात संबंधित विभागाने लक्ष द्यावे. तुळजापूर तालुक्यातील दहिफळ येथे चारशे केव्ही सब स्टेशनच्या जागेसाठी वनविभागाशी समन्वय साधून भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचनाही पुजार यांनी केल्या.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यासाठी जलसंधारण विभागाने नियोजन आतापासूनच करावे. शेतकऱ्यांना तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहित करावे. संबंधित यंत्रणांनी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. यावर्षी गाळ काढण्याचे दिलेले यंदाचे उद्दिष्ट हे मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे काम यंत्रणांनी करावे, असे पुजार यांनी सांगितले.

‘कृषी’ च्या क्लस्टरबेस योजना राबवा...

जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे.कृषीच्या योजना राबविताना क्लस्टर बेस योजना राबाव्यात.शेतकऱ्यांना नगदी पिकाकडे वळविण्यासाठी भाजीपाला व फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. मृदा तपासणी प्रयोगशाळा ह्या बचतगटांच्या गावपातळीवर ग्रामसंघ यांना देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे पूजार यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज व गोदामांची व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगून पुजार यांनी त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे. बचतगटांच्या ग्रामसंघांना अवजारे बँक देण्याबाबत कृषी विभागाने नियोजन करावे. पंचायत समितीनिहाय शिबिरे घेऊन त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक योजनांचा लाभ देणे सोयीचे होणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com