Farmer Death : आत्महत्यांच्या आकडेवारीत लपवाछपवी

Agriculture Crisis : खरिपातील शेतीमालास न मिळालेला अपेक्षित भाव, बॅंक व सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता, या विवंचनेत अमरावती जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत आत्महत्या करीत मृत्यू जवळ केला आहे.
Farmer Death
Farmer Death Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : खरिपातील शेतीमालास न मिळालेला अपेक्षित भाव, बॅंक व सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता, या विवंचनेत अमरावती जिल्ह्यातील २६ शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत आत्महत्या करीत मृत्यू जवळ केला आहे.

शासनदप्तरी यातील केवळ चार घटना मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्याने शासकीय यंत्रणा आकडेवारी लपवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या २०० घटनांची नोंद आहे. शासनाच्या तपासयंत्रणेने यातील ११९ आत्महत्या नापिकी, कर्ज भरण्यास अमर्थता या कारणांनी झाल्याचे अहवाल दिले आहेत.

Farmer Death
Farmer Death Compensation : शेतकरी आत्महत्येची २० प्रकरणे पात्र

तब्बल ६४ घटनांमध्ये अन्य कारणे असल्याचे म्हटले आहे. शासकीय निकषांत बसलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत देण्यात आली आहे. आत्महत्यांचा आलेख घटत असल्याचे दाखविण्याचा शासकीय यंत्रणांचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागला आहे.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या जानेवारी ते मार्च या कालावधीतील आहेत. गतवर्षी या तीन महिन्यांत आत्महत्येच्या ७९ घटनांची नोंद झाली होती. त्यातील ४९ घटना शासकीय यंत्रणांनी मदतीसाठी पात्र ठरविल्या. तीच स्थिती चालू वर्षात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत दर्शविण्यात आली आहे.

जानेवारीमध्ये १४ व फेब्रुवारीत १२ घटना घडल्यात. त्यापैकी जानेवारीतील चार घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या, तर फेब्रुवारीतील १२ पैकी सर्व व जानेवारीतील नऊ प्रकरणांत चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Farmer Death
Farmer Death : पाण्यासाठी संघर्ष उभा करणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या

आलेख घटल्याचा दावा

आत्महत्यांचा आलेख घटत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र हा आलेख घटना अपात्र ठरविण्यावर भर देण्यात येत असल्याने घटल्याचे दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न व योजना यशस्वी होत नसल्याचे वास्तव आहे.

शेतकरी आत्महत्यांची स्थिती

२०२५

महिना घटना पात्र

जानेवारी १४ ४

फेब्रुवारी १२ ०

शेतकरी आत्महत्या नसून त्या शासनाने केलेल्या हत्याच आहेत. उत्पादकता वाढविण्यास सांगणाऱ्या शासनाकडून शेतमाला भाव दिला जात नाही. सिंचन सुविधांचा गेल्या अनेक वर्षांचा अनुशेष आहे. आता तर आत्महत्यांचा आकडा कमी दाखवून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम शासन स्तरावर होत आहे.
- मनीषा जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com