Suicide Relief: शेतकरी आत्महत्येच्या मदत निधीचे अनेक प्रस्ताव फेटाळले

Maharashtra Agriculture: कर्जबाजारीपणा, नापिकी आणि शासनाच्या तुटपुंज्या मदतीमुळे शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. दरमहा आत्महत्या होत असून, त्यातही अर्ध्याहून अधिक कुटुंबांना शासकीय मदतनिधीही मिळत नाही.
Farmer Suicides
Farmer SuicidesAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: जिल्ह्यात दर महिन्याला शेतकरी आत्महत्या होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाचे पडलेले दर आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यात जे शेतकरी आत्महत्येचे प्रस्ताव शासकीय मदतनिधीसंबंधी प्रशासनाकडे पाठविले जातात, त्यातील प्रस्ताव नामंजूर किंवा फेटाळण्याचे प्रमाणही मोठे आहे.

जिल्ह्यात नव्या वर्षात मे अखेरपर्यंत सुमारे ९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील हंगामात कापूस, सोयाबीनला दर मिळाला नाही. कर्जबाजारीपणा वाढला. अनेक शेतकरी अडचणीत आले. अतिपावसात अनेकांची पिके हातून गेली. पीककर्ज भरता आले नाही. शासनाकडून कर्जमाफी झाली नाही.

Farmer Suicides
Fertilizer Relief: बफर स्टॉकमधून युरिया, डीएपीचा १ हजार ६६८ टन साठा खुला

यामुळे या सर्व अडचणी वाढल्या व शेतकरी आत्महत्येची समस्याही तीव्र झाल्याचे दिसत आहे. विविध तांत्रिक व अन्य कारणांनी हे प्रस्ताव नामंजूर केले जात असल्याची माहिती आहे. जे प्रस्ताव दाखल होतात, त्यावर जिल्हास्तरीय समिती कार्यवाही करते. पडताळणी व अन्य सोपस्कार पार पाडल्यानंतर प्रस्ताव मदतनिधीसाठी मंजूर केले जातात.

Farmer Suicides
Farmer Suicide Relief Funds : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मदतनिधीचा अभाव; सरकारकडून दुर्लक्ष?

यानंतर संबंधित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना मदतनिधी प्रशासन देते. यात जिल्ह्यात या वर्षी म्हणजेच जानेवारी ते मे या कालावधीत शेतकरी आत्महत्येचे ९० प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले होते. यातील ३० प्रस्तावांना मंजुरी मिळाली. तर ३१ प्रस्ताव अपात्र ठरले. तर अन्य प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय समिती पडताळणी करताना विविध कारणांचा शोध घेते. त्यात हे प्रस्ताव तालुकास्तरावरून प्रशासन सादर करते. परंतु पडताळणी करताना कर्जबाजारीपणा, नापिकी या कारणांनी आत्महत्या झालेली नसल्याचे दिसते. यामुळे संबंधित प्रस्ताव मदतनिधीसाठी अपात्र ठरतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com