Fertilizer Relief: बफर स्टॉकमधून युरिया, डीएपीचा १ हजार ६६८ टन साठा खुला

Parbhani Farmers: परभणी जिल्ह्यात मेपासून खतांचा तुटवडा असून, खरीप पेरणीसाठी १६ जून रोजी बफर स्टॉकमधून ४१८ टन डीएपी आणि १,२५० टन युरिया, एकूण १,६६८ टन खते खुली केली गेली.
Fertilizer Relief
Fertilizer ReliefAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: परभणी जिल्ह्यात यंदाच्या मे पासून विविध ग्रेडच्या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची गरज व मागणी लक्षात घेऊन सोमवारी (ता. १६) संरक्षित खतसाठ्यामधून (बफर स्टॉक) डीएपी ४१८ टन आणि युरिया १ हजार २५० टन मिळून एकूण १ हजार ६६८ टन खते खुली करण्यात आली आहेत.

कृषी निविष्ठा केंद्रावरून प्रति शेतकरी डीएपी खताच्या २ बॅग आणि युरियाच्या ३ बॅग मिळून एकूण ५ बॅगची विक्री केली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.खरीप हंगाम २०२५ साठी परभणी जिल्ह्याला विविध ग्रेडची १ लाख ४५ हजार ११४ टन रासायनिक खते मंजूर केली आहेत.

Fertilizer Relief
Illegal Fertilizer : श्रीरामपूर, राहुरीला साडेदहा लाखांचे बेकायदा खत जप्त

मागणीपेक्षा १४ हजार ५८६ टन कमी परंतु खरीप २०२४ च्या तुलनेत २१ हजार ८१४ टन अधिक खते मंजूर आहेत. १ एप्रिलपासून सोमवारपर्यंत (ता. १६) ५१ हजार ७४६ टन खतांचा पुरवठा झाला. ३१ मार्चअखेरचा ४७ हजार ९४२ टन मिळून एकूण ९९ हजार ६८९ टन साठा उपलब्ध होता. त्यापैकी ५० हजार १७७ टन खतांची विक्री झाली. यंदा मे पासून डीएपी खत मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.

Fertilizer Relief
Fertilizer Shortage : पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा

त्यासंदर्भात ‘मंजूर आवंटनाइतका पुरवठा नसल्याने डीएपी खतांचा तुटवडा’ या शीर्षकाचे वृत्त ‘ॲग्रोवन’च्या ३० मे च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. जूनमध्ये पेरण्या सुरू झाल्या. खतांची मागणी वाढली आहे. डीएपी,१०ः२६ः२६ आदी ग्रेडची खते अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही ठिकाणच्या विक्रेत्यांनी साठेबाजी केली आहे. एमआरपीपेक्षा ४०० ते ५०० रुपये जास्त दराने खताची विक्री करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १६) बफर स्टॉकमधून राज्य पणन महासंघामार्फत युरिया ९५० टन व डीएपी ३०९ टन तर कृषी विकास महामंडळामार्फत युरिया खतांचा ३०० टन व डीएपीचा १०९ टन साठा शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले.खरीप हंगामात विशेषतः जून, जुलै, ऑगस्ट या कालावधीत शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी व वापर जास्त असतो.

या कालावधीत विविध कारणांमुळे खतांच्या मागणीनुसार पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. यंदा २०२५-२६ मध्ये राज्य सहकारी विपणन महासंघ व कृषी उद्योग महामंडळ यांच्यामार्फत युरियाचा ३ हजार टन व डीएपीचा १ हजार ३०० टन मिळून ४ हजार ३०० टन खत संरक्षित साठ्याचे उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com