Free Electricity : शेतकऱ्याला १ लाख २० हजार रुपयांचं वीज बिल; शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची आ. कैलास पाटील यांची टिका

farmer’s welfare : विधिमंडळात शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचं १ लाख २० हजार रुपये बिल आल्याचं पाटील यांनी दाखवलं. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही पाटील यांनी केला. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांना बिलं पाठवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
 : शेतकऱ्याला १ लाख २०
: शेतकऱ्याला १ लाख २० Agrowon
Published on
Updated on

MLA Kailas Patil’s : राज्य सरकारने निवडणुकीच्यापूर्वी ७.५ एचपी कृषीपंपासाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. परंतु आता शेतकऱ्यांना वीज बिल पाठवली जात असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केला. यावेळी विधिमंडळात शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचं १ लाख २० हजार रुपये बिल आल्याचं पाटील यांनी दाखवलं. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही पाटील यांनी केला. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांना बिलं पाठवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्य सरकारकडून निवडणुकीपूर्वी राज्यातील जवळपास ४४ लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवली. या योजनेतून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु निवडणुकीनंतर आता मात्र शेतकऱ्यांना थकबाकीसह बिल पाठवले जात आहेत, अशी माहिती पाटील यांनी केला आहे.

 : शेतकऱ्याला १ लाख २०
Free Electricity : कृषीपंपांच्या मोफत विजेचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा; कृषिमंत्र्यांचे थकीत बिलावर उत्तर

शेतकऱ्याला पाठवण्यात आलेलं वीज बिल सभागृहात दाखवत आमदार पाटील म्हणाले, "त्याला (शेतकऱ्याला) निवडणुकीपूर्वी झिरो बिल होतं. डिसेंबरचं जे बिल आलं त्यात १ लाख १२ हजाराच्या थकबाकीसह बिल देण्यात आलं. महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलं आहे. सरकारनं निवडणूक काळात मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली." असं पाटील म्हणाले.

तुम्ही विधानसभेत घोषणा केली. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिलं वाटली. आणि नंतर त्यांना थकबाकीची बिलं येत असतील तर त्यांची भावना काय असेल? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी बातील म्हणाले, शेतकऱ्यांना चालू बिल माफ केले आहे की, थकबाकीसह बिल माफ केले आहे, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी द्यावी. आणि थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिलं कशी येत आहेत, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिक जिल्ह्यात निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला मोफत वीज मिळाली पाहिजे असं म्हणत मोफत वीज योजना राबवल्याचं सांगितलं होतं. त्यावरून विरोधकांनी टिका केली. त्यावर अजित पवारांनी पुढचे पाच वर्ष मोफत वीज ठेवली नाही तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं म्हणाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com