
Parbhani News : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये सहभागी होण्याकरिता अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य आहे. परभणी जिल्ह्यात मृग बहरासाठी संत्रा, लिंबू, पेरू, मोसंबी, चिकू, डाळिंब, सीताफळ या ७ फळपिकांना लागू आहे.
संत्रा, पेरू, लिंबू या फळपिकांच्या विमा प्रस्तावासाठी शनिवार (ता. १४) पर्यंत अंतिम मुदत आहे. मोसंबी, चिकूसाठी ३० जूनपर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलै तर सिताफळासाठी ३१ जुलै पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येतील अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.
परभणी जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि. कंपनीद्वारे राबविली जात आहे. १५ मे २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा १५ एप्रिल २०२५ अनिवार्य केला आहे.
आंबिया बहर सन २०२५-२६ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा व पपई या ६ पिकांसाठी फळ पिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. केवळ उत्पादनक्षम फळपिकांसाठी या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाचे कवच लागू आहे.आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मार्फत विमा प्रस्ताव सादर करता येतील.
अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहरापैकी कोणत्याही एका हंगामाकरिता विमा संरक्षण घेता येईल. मृग बहारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालय, राष्ट्रीयीकृत बॅँका यांच्याशी संपर्क साधावा अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) तत्काळ काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.
फळपिके...समाविष्ट महसूल मंडळे
संत्रा ःपेडगाव, जांब, टाकळी कुंभकर्ण, जिंतूर, बोरी, सावंगी म्हाळसा, आ़़डगाव, सेलू, वालूर, देऊळगाव गात, कुपटा, मानवत, कोल्हा, केकरजवळा, ताडबोरगाव, पाथरी, पूर्णा, चुडावा, कात्नेश्वर, ताडकळस, लिमला, कावलगाव.
लिंबू ः दैठणा, सिंगणापूर, सेलू, वालूर, चिखलठाणा, देऊळगाव गात, कुपटा, मोरेगाव, पाथरी, हदगाव बुद्रुक, बाभळगाव, आवलगाव, शेळगाव, वडगाव, माखणी, पूर्णा.
पेरु ः परभणी ग्रामीण, झरी, टाकळी कुंभकर्ण, सेलू, वालूर, मोरेगाव, हदगाव बुद्रुक, वडगाव.
चिकू ः टाकळी कुंभकर्ण, पूर्णा.
मोसंबी ःपरभणी, झरी, जिंतूर, बोरी, सेलू, वालूर, कुपटा, मोरेगाव, मानवत, केकरजवळा, कोल्हा, पाथरी, हदगाव बुद्रुक, पूर्णा चुडावा, लिमला, कावलगाव.
डाळींब ः चारठाणा, आडगाव, सेलू.
सिताफळ ः पेडगाव, जांब, जिंतूर, बामणी, सेलू, वालूर, मोरेगाव, ताडबोरगाव, गंगाखेड, माखणी, महातपुरी, राणीसावरगाव, पिंपळदरी, चुडावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.