Dairy Crisis: दूधदराअभावी शेतकऱ्याला मोठा धक्का! ४० गाईंचा गोठा मोडला

Economic Impact: उत्तर सोलापूर तालुक्यातील दुधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबीदारफळ गावातील आदर्श गोपालक म्हणून पुरस्कारप्राप्त खडतरे बंधूच्या गोठ्यात तीन वर्षांपूर्वी चाळीस गाई होत्या. पण आता त्यांनी त्यांचा हा गोठा मोडला आहे.
Milk Farmer
Milk FarmerAgrowon
Published on
Updated on

Solapur News: उत्तर सोलापूर तालुक्यातील दुधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबीदारफळ गावातील आदर्श गोपालक म्हणून पुरस्कारप्राप्त खडतरे बंधूच्या गोठ्यात तीन वर्षांपूर्वी चाळीस गाई होत्या. पण आता त्यांनी त्यांचा हा गोठा मोडला आहे. एकीकडे दुधाचे घसरते दर, दुसरीकडे चाऱ्याचे वाढते दर यामध्ये खर्च आणि नफ्याचे गणित जुळत नसल्याने थेट गोठाच मोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

बीबीदारफळ गावात कोरोनाच्या साथीपूर्वी प्रतिदिन जवळपास दहा ते बारा हजार लिटर दूध संकलित केले जात होते. आठ ते नऊ संकलन केंद्रे दूध संकलित करत होती. या व्यवसायातून गावात दररोज पाच ते सहा लाखांची उलाढाल होत होती. यामध्ये दूध केंद्रांसह पशुखाद्य विक्री, दूध वाहतूक करणारी वाहने यांच्यासह इतर घटक सामील आहेत.

Milk Farmer
Milk Samples Seized : राज्यात १ हजारहून अधिक दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासनची भेसळखोरांविरोधात धडक मोहीम

सध्याच्या दूध व्यावसायातील परिस्थितीमुळे हे सर्व घटक प्रभावित झाले आहेत. आजघडीला गावात फक्त चार ते पाच हजार लिटर दूध उत्पादित होत आहे. एकीकडे दुधाचे घसरते दर, चाऱ्याचे वाढते दर आणि शासनाकडून मिळणारे अनुदानही रखडत असल्याने दूध उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत.

Milk Farmer
Milk Subsidy : शेतकऱ्यांचा गाईंसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; दूध अनुदानावरून शेतकरी संघटना आक्रमक

सोलापूरच्या दूध संकलनात पुणे जिल्ह्यातील मोठ्या खासगी व्यावसायिकांची मगरमिठी बसली आहे, यातील काही घटक सत्ताधारींसह विरोधी पक्षात बसले आहेत. त्यांच्या अभद्र युतीमुळे शासनाकडून दुधाचा दर एफआरपीच्या माध्यमातून ठरवणे, दुधातील भेसळ रोखणे, इतरराज्यांप्रमाणे सहकारी दूध संस्थांचा एकच ब्रॅण्ड तयार करणे यासह इतर निर्णय होत नाहीत. खासगी व्यावसायिकांच्या नफेखोरीमुळे दूध व्यवसाय आर्थिक अरिष्टात सापडला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले, दुधाचे दर मात्र दोन वर्षांत तब्बल दहा रुपयांनी कमी झाले. गोठ्यातील जनावरे संभाळताना डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला, यामुळे मनावर दगड ठेवत दारातील दुधाळ जनावरे विकली. या साऱ्या परिस्थितीला सरकारची धोरणे जबाबदार आहेत.
ब्रह्मदेव खडतरे, दूध उत्पादक, बीबी दारफळ, ता. उ. सोलापूर
तीन वर्षांपूर्वी माझ्या दूध संकलन केंद्रात प्रति दिवस तीन हजार लिटरहून अधिक दूध संकलित होत होते, आज ते दीड हजार लिटरच्या जवळपास आहे. दूध धंद्यातील मंदीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यासह या व्यवसायातील डेअरी चालक, पशुखाद्य विक्रेते यासह इतर सर्वच घटक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत.
शंकर साठे, दूध संकलन, केंद्रचालक, बीबीदारफळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com