Milk Samples Seized : राज्यात १ हजारहून अधिक दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासनची भेसळखोरांविरोधात धडक मोहीम

Maharashtra Food and Drug : राज्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिवसाला १ कोटी ७१ लाखाहून अधिक दूध संकलन होते. महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन वाढत असताना भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती.
Milk Samples Seized
Milk Samples SeizedAgrowon
Published on
Updated on

Milk Samples Seized Maharashtra : राज्य अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात मंगळवारी (ता.२८) १ हजार ६७ दुधाचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवाल येताच संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अन्न व दुग्ध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राज्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिवसाला १ कोटी ७१ लाखाहून अधिक दूध संकलन होते. महाराष्ट्रात दुधाचे भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. यावर अंकुश लावण्यासाठी दुग्धविकास विभागाने धडक मोहीम राबवली आहे. विविध जिल्ह्यात दुधाची मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुग्धविकास विभागाची बैठक घेत अनेक सूचना केल्या होत्या. यावर अन्न आणि औषध प्रशासनाने दूध विक्रेते, वितरक, डेअरी, दूध संकलन केंद्र येथील पिशवी बंद व सुट्या दुधांचे नमूने घेतले आहेत. या कार्यक्रमानुसार संपूर्ण राज्यात १०० दिवसांमध्ये ५ हजार दुधाचे नमूने घेण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाने मंगळवारी १ हजार ६७ दुधाचे नमूने घेतले आहेत.

Milk Samples Seized
Milk Protest: दूध आंदोलनांचे आवर्तन कधी संपणार?

दुग्धविभागाने केलेल्या कारवाईमध्ये पिशवी बंद आणि नामांकित कंपन्यांच्या दुधाचे ६८१ नमूने, तर सुट्या दुधाचे ३८६ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे, कमी प्रतीचे दूध असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

खासगी प्रयोगशाळांबरोबर करार

दुधाचे नमुने घेतल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल येण्यास विलंब होत असल्याने दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडथळे येतात. त्यामुळे दुधाच्या नमुन्यांचा अहवाल जलदगतीने मिळावा यासाठी खासगी प्रयोगशाळांबरोबर करार करण्यात आला आहे. त्यामुळे या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com