
Agriculture Technology :
`रोहित कृषी`ची टोकण, पेरणी यंत्रे वेधताहेत लक्ष
`सकाळ-अॅग्रोवन`च्या अॅग्री एक्स्पो-२०२५ कृषी प्रदर्शनामध्ये रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनामध्ये बहुपीक टोकण यंत्र आणि कांदा पेरणी यंत्राने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. कमी वेळेत, कमी खर्चात होणाऱ्या पेरणीमुळे शेतकऱ्यांचा कल या यंत्रांकडे आहे. अॅग्री एक्स्पो-२५ या कृषी प्रदर्शनामध्ये रोहित कृषी इंडस्ट्रीज हे गिफ्ट स्पॅानसर्स आहे. कंपनीने शेतीकामासाठी उपयुक्त ठरणारी ७० मॉडेल्स तयार केली आहेत. त्यापैकी १२ मॉडेल्स या ठिकाणी पाहण्यास उपलब्ध आहेत.
यामध्ये बैलचलित टोकण, पेरणी यंत्र, ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र, मनुष्यचलित टोकण, पेरणी यंत्र, कांदा टोकण, पेरणी यंत्र, बीबीएफ टोकण, पेरणी यंत्र आदींचा समावेश आहे. विशेषतः कांदा टोकण, पेरणी यंत्र, बैलचलित टोकण, पेरणी यंत्र आणि मिनी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. याबाबत कंपनीचे एरिया मॅनेजर श्रीराम गोरे म्हणाले, की पेरणी यंत्रांची बांधणी, जोडणी सोपी असून, शेतकऱ्यांना कुशलतेने हाताळता येते. देखभालीचा खर्चही कमी आहे. या पेरणी यंत्राच्या वापराने २० ते ३० टक्के उत्पादन वाढ मिळते.
‘पितांबरी’चे गोमय सेंद्रिय खत
पितांबरी प्रॉडक्ट प्रा.लि.च्या अॅग्रिकेअर डिव्हिजनच्या दालनात फळझाडे, फुलझाडांच्या रोपांसह शेतीसाठी उपयुक्त ठरणारी उत्पादने मांडण्यात आली आहेत. यामध्ये विद्राव्य स्वरूपातील विविध श्रेणी उपलब्ध आहेत. गोमय सेंद्रिय खत, पितांबरी नीम पावडर आणि फ्लाय कॅचर नर आणि मादी फळमाशी सापळा शेतकऱ्यांचे आकर्षण ठरला आहे. देशी गाईंचे शेण, गोमूत्राचा वापर करून गोमय सेंद्रिय खत तयार केले आहे. यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू वाढण्यास मदत होते. नीम पावडर जमीन सुपीकता आणि मातीचे आरोग्य राखण्यास फायदेशीर आहे.
सुबहर यूएएन-३२, सुबहर पी.पी.पी., सुबहर ए.पी.पी., आणि सुबहर सी.एन. यासारख्या विविध प्रकारच्या द्रवरूप खतांची श्रेणी याठिकाणी पाहायला मिळते. फुलझाडे, फळझाडे, मसाला पिके, शोभिवंत झाडांची रोपे या ठिकाणी उपलब्ध आहेत. नॅनो-फ्लो तंत्रज्ञानावर आधारित फ्लायकॅचर नर आणि मादी फळमाशी सापळे शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहेत. याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले, की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, त्यांना चांगले उत्पादन मिळावे, हा आमचा उद्देश आहे. यासाठी १४ द्रवरूप आणि २ दाणेदार स्वरूपाची खते आम्ही विकसित केली आहेत.
‘चितळे डेअरी’ची दुग्धजन्य उत्पादने
भिलवडी (जि.सांगली) येथील मे. बी. जी. चितळे यांच्या कृषी प्रदर्शनातील दालनामध्ये चितळे डेअरीची विविध दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध आहेत. गाय, म्हशीच्या लिंगनिर्धारित रेतमात्रांबाबत माहिती दिली जात आहे. मुरघाससाठी उपयुक्त सायलेज बॅग वापराचे प्रात्यक्षिक तसेच या बॅगा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दालनात ताक, तूप, पनीर यासह दूध, श्रीखंड, लस्सी, विविध स्वादाचे जॅम,आंबा पल्प, टोमॅटो केचप, विविध प्रकारचे बटर उपलब्ध आहे. जनावरांची निवड, कृत्रिम रेतन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दालनामध्ये दिली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.