Vidarbha Cotton Farming : कापूस उत्पादक पर्यायी पिकांच्या शोधात

Cotton Cultivation : पश्चिम विदर्भातील कोरडवाहू पट्ट्यात गेल्या दहा वर्षांत कापसाच्या पेरणीक्षेत्रात वाढ दिसत असली तरी उत्पादकता झपाट्याने कमी होऊ लागली आहे.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : पश्चिम विदर्भातील कोरडवाहू पट्ट्यात गेल्या दहा वर्षांत कापसाच्या पेरणीक्षेत्रात वाढ दिसत असली तरी उत्पादकता झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यामुळे शेतकरी पर्यायी पिकांचा शोध घेऊ लागले आहेत.

कोरडवाहू पट्ट्यात कापूस हे नगदी पीक असून या भागातील वातावरण कापसासाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांचे हे मुख्य पीक आहे. अमरावती विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर असून दरवर्षी सरासरी १० लाख हेक्टरच्या जवळपास पेरणी केल्या जाते. अलीकडे वातावरणातील बदलामुळे हंगाम जोखमीचा झाला आहे.

बियाण्यांसह रासायनिक खते, कीटकनाशके व मजुरीचे आवाक्याबाहेरील दर आणि अशातच कापूस पिकाला भाव न मिळणे, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याने आता पर्यायी पिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून यंदाच्या खरीप हंगामात लागवड घटण्याची शक्यता आहे.

Cotton Farming
US Cotton Cultivation: अमेरिकेत कापूस लागवड १४ टक्क्यांनी घटणार

कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी किमान २० ते २२ हजार रुपये खर्च सहज येतो. टप्प्याटप्प्याने हा खर्च होत असला तरी घरात आलेला कापूस संपूर्णपणे विकला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला सर्व खर्चाची तरतूद कर्ज काढून व उधार उसणवारीने करावी लागते. इतके सगळे केल्यानंतरही अपेक्षेनुसार उत्पादन हाती येत नसल्याने व योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण झाले आहे.

अमरावती विभागात दहा वर्षांपूर्वी २०१३-१४ च्या हंगामात १० लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड होती. त्या वर्षी प्रति हेक्टरी ३९५ किलो रूईचे उत्पादन झाले, तर वर्ष २०२४-२५ च्या हंगामात १० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली व उत्पादनाची सरासरी ४७१ किलो प्रति हेक्टर आली. दहा वर्षांत २५ हजार हेक्टरने क्षेत्रवाड व ७६ किलोची उत्पादनवाढ ही समाधानकारक बाब नसल्याने शेतकऱ्यांनी वाढत्या खर्चापुढे आता कापसाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

Cotton Farming
Cotton Cultivation : मशागतीला वेग; कापूस लागवडीची लगबग

हमीदर वाढीची गरज

एकाधिकार मोडीत निघाल्यानंतर ‘सीसीआय’मार्फत खरेदीचा पर्याय समोर आला. वर्ष २०२४-२५ च्या हंगामात सीसीआयने हमीदराने कापसाची खरेदी केली असली तरी मुळात शेतकऱ्यांना उत्पादनाची सरासरी बघता हाती फारशी मिळकत आली नाही. कापसाचे हमीदर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अजूनही कमीच असल्याने शासकीय खरेदी पुरेशी वाटत नाही.

गेल्या दहा वर्षांतील क्षेत्र व उत्पादन

वर्ष क्षेत्र (हेक्टर) उत्पादकता (हेक्टरी रुई प्रति किलो)

२०१३-१४ १०,१२,७०० ३९५

२०१४-१५ ९,५९,००० १३३.९१

२०१५-१६ ९,६५,१०० २२५.५७

२०१६-१७ ९,६४,११३ ५११.१२

२०१७-१८ १०,३६,११३ २१२.७८

२०२८-१९ १०,३५,६०० ३६७

२०१९-२० ११,२१,९०० २४४

२०२०-२१ ११,३३,८०० ३५९

२०२१-२२ ११,२४,३०० ३४१

२०२२-२३ ११,२२,१०० २८८

२०२३-२४ १०,८३,४५० ४८२

२०२४-२५ १०,३७,५२५ ४७१.७९

प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटले असताना त्यास चांगला बाजारभावदेखील नाही. हमीदरही अपेक्षेनुरूप उत्पादन खर्चावर आधारित नाहीत. वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत पीक वाचवताना कसरत व खर्च वाढला आहे. त्यामुळे आता अन्य पिकांचा विचार करण्याची वेळ आली आहे.
- अरविंद चोपडे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com