Orange Rate : संत्रा दरात घसरण; व्यापाऱ्यांनी पाडले भाव

प्रति किलो १५ ते २० रुपये दर; उत्पादक शेतकरी मेटाकुटीस
Orange Rate
Orange RateAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
शेंदूरजनाघाट, अमरावती : कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी (Heavy Rainfall), तर कधी हवामान बदलाचा (Environmental Change) फटका शेतकरीवर्गाला नेहमीच सहन करावा लागतो. त्यातच यंदा व्यापारी पडेल भावात संत्रा खरेदी करीत आहेत. आरोग्यवर्धक संत्र्याला प्रतिकिलो १५ ते २० रुपयेच भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे

Orange Rate
Orange Pest : संत्री, मोसंबीवरील पाने खाणारी अळी, सायला व्यवस्थापन

वरुड तालुक्‍यात शेकडो कोटींची उलाढाल करणारा व्यवसाय हा संत्र्याचा आहे. या वर्षी संत्र्याच्या आंबिया बहराला अति उष्णतामानाचा फटका बसला. त्यामुळे फुटलेल्या बहरापैकी अर्धा बहर गळून गेला. त्यातच पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे संत्राझाडांना मृग बहराची संत्री फुटलीच नाही. पुढे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिपावसाने कधी नव्हे ती संत्राफळांना गळती लागली. त्यातच झाडांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांजळ १५ टक्केही संत्रा राहिला नाही. असे असतानाही व्यापाऱ्यांनी संत्र्याचे भाव पाडले. सध्या संत्र्याचे भाव ३० ते ३५ हजार रुपये टन व क्रेटचे भाव रुपये ७०० प्रति कॅरेटच्या वर असायला हवे होते; मात्र व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने सध्या संत्री अवघी १५ ते २० रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत. त्यामुळे संत्र्याला राजाश्रयाची गरज असून शासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.

आजवर संत्र्याच्या रोज ५० गाड्या बांगलादेशला जायच्या. परंतु कस्टम ड्यूटी वाढल्याने केवळ ७ ते ८ गाड्याच जात असल्याने संत्र्याचा उठाव नाही. पूर्वी ४८ रुपये ड्यूटी होती. परंतु ती वाढली. ती वाढली नसती तर आज संत्री ३४ ते ५० रुपये किलो या भावाने विकली गेली असती.
- रियाज खान, संत्रा व्यापारी

Orange Rate
Sweet Orange : शेतकरी नियोजन पीक ः मोसंबी

सार्वत्रिक संत्र्याची गळ मोठ्या प्रमाणात असताना व बाजारात संत्रा कमी असतानाही संत्र्याचे पडलेले भाव शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण आहे. शासनाने संत्रा उत्पादकांना कमीत कमी अडीच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.
- स्वप्नील देसली, संत्रा उत्पादक, तिवसाघाट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com