Orange Pest : संत्री, मोसंबीवरील पाने खाणारी अळी, सायला व्यवस्थापन

अळी मोठी झाल्यानंतर हिरवट रंगाची होते. या अळ्या कोवळी पाने खातात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण झाड पर्णविरहित दिसते. याचे पतंग काळ्या, पिवळ्या आकर्षक रंगाचे असतात.
Sweet Orange Past
Sweet Orange PastAgrowon

डॉ. योगेश मात्रे, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. अनंत बडगुजर

सद्यःस्थितीत मोसंबी व संत्रा पिकावर पाने खाणारी अळी (लेमन बटरफ्लाय) (Lemon Butterfly) व सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

पाने खाणारी अळी

या किडीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटिकेत (Nursery) होतो. लहान अळ्या तपकिरी रंगाच्या असून, त्यावर पांढरे ठिपके असतात. त्यामुळे एखाद्या पक्षाची विष्ठा पडल्यासारख्या दिसतात. अळी मोठी झाल्यानंतर हिरवट रंगाची होते. या अळ्या कोवळी पाने खातात. अधिक प्रादुर्भावामध्ये संपूर्ण झाड पर्णविरहित दिसते. याचे पतंग काळ्या, पिवळ्या आकर्षक रंगाचे असतात.

व्यवस्थापन :

-अंडी, अळ्या व कोष हातांनी गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून मारावेत.

-झाड हलवून खाली पडलेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

- बागेतील अथवा आजूबाजूस असलेले बावची या तणाचा बंदोबस्त करावा.

-मित्र कीटक उदा. ट्रायकोग्रामा, अपेन्टेलिस, कॅरोप्स, ब्रॅचीमेरिया, टेरोमॅल्स यांचे संवर्धन करावे.

-बॅसिलस थुरीन्जिएन्सिस (बीटी) पावडर २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

-क्विनॉलफॉस (२० ईसी) ३ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Sweet Orange Past
Ghonas Worm : घोणसअळीने चावा घेतला,अन तो थेट रुग्णालयात पोहचला

सिट्रस सायला

या किडीचा प्रौढ पिवळसर करड्या रंगाचा असतो. पंखांच्या विशिष्ट रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. पिले मळकट रंगाची असतात. या किडींची पिले कोवळी पाने व फांद्या यातून रसशोषण करतात. त्यामुळे कोवळी पाने व कळ्यांची गळ होते. त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

व्यवस्थापन :

-पर्यायी खाद्य वनस्पती (कडीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये असू नये.

-पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा.

-ढालकीटक, क्रायसोपा, सिरफीड माशी, टॅमरॅक्सिया रॅडीयाटा इ. मित्र कीटकांचे संवर्धन करावे.

-सायलाचा प्रादुर्भाव दिसताच, फवारणी प्रति लिटर पाणी

इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.१ मि.लि. किंवा

थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम.

गरज पडल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी कीटकनाशक बदलून करावी.

डॉ. योगेश मात्रे, ७३८७५२१९५७,

डॉ. राजरतन खंदारे, ८२७५६०३००९

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com