Pesticide Use : किडनाशके फवारताना अशी काळजी घ्या होणार नाही विषबाधा

Team Agrowon

कीडनाशकाची शेतात फवारणी करतेवेळी प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवावे.

Pesticide Use | Agrowon

खाद्य पदार्थ, इतर औषधांसोबत कीडनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये; तसेच कीडनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाहीत, अशा ठिकाणी कुलूप बंद ठेवावीत.

Pesticide Use | Agrowon

फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, बूट इ. चा वापर करावा. संपूर्ण शरीर झाकले जाईल, याची काळजी घ्यावी.

Pesticide Use | Agrowon

कीडनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहितीपत्रक व्यवस्थित वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.

Pesticide Use | Agrowon

तणनाशके फवारणीचा पंप कीडनाशक फवारणीसाठी वापरू नये. कीडनाशके फवारणीसाठी हातापायावर जखम असलेल्या व्यक्तींची निवड करू नये.

Pesticide Use | Agrowon

फवारणीदरम्यान नोझल गच्च झाल्यास किंवा कचरा अडकल्यास तोंडाने साफ करू नये. तारेचा वापर करावा.

Pesticide Use | Agrowon

फवारणीचे काम सुरू असताना खाणे, पिणे, तंबाखूचे सेवन, धूम्रपान अगर मद्यपान करू नये.

Pesticide Use | Agrowon

कीडनाशक हाताळताना नेहमी हातात हातमोजे घालावेत. कीडनाशकाचे द्रावण हाताने न ढवळता काडीच्या साह्याने हातात हातमोजे घालूनच ढवळावे.

Pesticide Use | Agrowon

कीडनाशकाचे रिकामे डबे शेतात फेकून देऊ नयेत. रिकामे डबे, बाटल्या यांची योग्य विल्हेवाट लावावी. त्यामध्ये  विहीर, नदीपासून दूर जमिनीत सुरक्षित ठिकाणी खोल गाडून टाकावेत.

Pesticide Use | Agrowon
आणखी पाहा...