Expired Pesticides : जुन्नरला कृषी सेवा केंद्रांत आढळली कालबाह्य कीटकनाशके

Agricultural Service Centers : राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. तपासणीत निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दोन कृषी सेवा केंद्रात कालबाह्य कीटकनाशके आढळली आहेत.
Agricultural Service Centers
Agricultural Service CentersAgrowon
Published on
Updated on

Junnar News : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राजगुरुनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. तपासणीत निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दोन कृषी सेवा केंद्रात कालबाह्य कीटकनाशके आढळली आहेत.

Agricultural Service Centers
Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. योग्य खुलासा सादर न केल्यास कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. शिरसाट यांनी दिली.

Agricultural Service Centers
Pesticides Use : कीटकनाशकांचा संतुलित, सुरक्षित वापर गरजेचा : डॉ. प्रसाद

शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी पी. बी. पवार, कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी नारायणगाव, निमगाव सावा येथील श्री. कृषी भंडार, सर्वज्ञ ॲग्रो सेल्स, जय गुरुदेव अॅग्रो ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. तपासणीत निमगाव सावा येथील जय गुरुदेव ॲग्रो ट्रेडर्स, श्री.कृषी भंडार या कृषी सेवा केंद्रांत कालबाह्य औषधे आढळून आली.

सध्या रब्बी हंगामात कांदा, गहू, पूर्वहंगामी ऊस, हरभरा आदी पिकांच्या लागवडीची कामे सुरू आहेत. यामुळे खते, कीटकनाशके आदींची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्की बिले घ्यावीत. बियाणे, खते, कीटकनाशके यावरील कालबाह्यता पाहून घ्यावी.
राजश्री नरवडे, कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com