Pesticide Disposal Costs Issue : प्रतिबंधित कीटकनाशकांच्या विल्हेवाटीचा खर्च विक्रेत्यांवर

Banned Pesticide Disposal Update : जप्त केलेल्या प्रतिबंधित कीटकनाशकांच्या विल्हेवाटेसाठी लागणारा खर्चसुद्धा विक्रेत्यांकडून वसूलण्यात यावा, असे आदेश गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले.
Court of First Class Magistrate, Gondiya
Court of First Class Magistrate, GondiyaAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भातून नामशेष होत चाललेल्या सारस पक्षाला प्रतिबंधित कीटकनाशकांचा धोका असल्याने त्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते आहे. गोंदियात अशा एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याच्याकडून जप्त केलेल्या प्रतिबंधित कीटकनाशकांच्या विल्हेवाटेसाठी लागणारा खर्चसुद्धा त्याच्याकडून वसूलण्यात यावा, असे आदेश गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेत, अशी माहिती गोंदिया कृषी विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केली.

सारस पक्षाच्या धोक्यात आलेल्या अस्तित्वाची उच्च न्यायालयाने दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. मागील सुनावणी दरम्यान प्रतिबंधित कीटकनाशक वापराबाबत माहिती देण्यात आली होती. यावर कृषी विभागाने काय कारवाई केली याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Court of First Class Magistrate, Gondiya
Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

या वेळी नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया येथील कृषी अधीक्षकांनी शपथपत्र सादर केली. त्यानुसार, गोंदियातील कृषी विभागाने २६ गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचा समावेश असलेली नऊ भरारी पथके तयार केली. या पथकांनी केलेल्या कारवाईदरम्यान फोरेट नावाच्या प्रतिबंधित कीटकनाशकाचा १४ लाख रुपये किमतीचा ८२९ किलोंचा साठा आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Court of First Class Magistrate, Gondiya
Illegal Pesticides License Fees : परवाना नूतनीकरणावरील शुल्क वसुली बेकायदेशीर

त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाटही लावण्यात आली. तसेच ज्याच्याकडून हे कीटकनाशक जप्त करण्यात आले. त्याच्याकडून या विल्हेवाटेची रक्कम वसूल केली जावी, असे आदेश गोंदिया येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कार्यालयाने दिलेत, अशी माहिती गोंदिया कृषी अधीक्षकांनी दिली. तसेच बनावट क्लोरोफायरीफोस खत विकणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. याखेरीज काही दुकानांवर विक्रीत अनियमितता आढळून आल्या. त्यामुळे अशा १२ दुकानदारांचे परवाने रद्द केले असून एकूण २४ दुकाने कायमची बंद करण्यात आलीत, असेही सांगण्यात आले.

पाच दुकानांचे परवाने रद्द

नागपुरातील तपासणी दरम्यान १२ बनावट नमुने आढळून आले. तसेच, भंडारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत बंदी असलेली कीटकनाशके आढळून आली नाही. एकूण १५३ नमुने घेण्यात आले. त्यातील एक नमुना सदोष होता. त्यासंदर्भात कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. काही अनियमितता केल्यामुळे पाच दुकानांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com