
Nanded News : सामायिक सुविधा केंद्र चालकांनी शासकीय तसेच संस्थेच्या जमिनीवर संमतिपत्र नसताना नांदेड जिल्ह्यातील चार हजार ४५३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना व उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पीकविमा भरला. या प्रकरणी कृषी विभागाच्या फिर्यादीवरून ४० सामायिक सुविधा केंद्र (सीएससी) चालकांविरुद्ध एक जुले रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पीकविमा योजना ही कृषी विभाग व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४ मध्ये राबविण्यात आली. त्यामध्ये विमा अर्ज दाखल करताना सातबारा, स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक, आधार व शेती करार पद्धतीने करत असलेल्या करारपत्र बंधनकारक असते.
त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ मध्ये कागदपत्रांची छाननी विमा कंपनीकडून केली असता, ता. एक जुलै २०२४ पासून काही सामायिक सुविधा केंद्र चालकांनी शासकीय जमिनीवर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच संस्थेच्या जमिनीवर भाडेकरार संमतिपत्र नसताना नांदेडला चार हजार ४५३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर बीड, परभणी, पुणे, लातूर, जालना, नांदेड व उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांच्या नावार सीएससी चालकांनी विमा भरल्याचे कंपनीने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी कृषी विभागाला कळविले होते.
याप्रकरणी ता. चार मार्च २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय पीकविमा आढावा समितीच्या बैठकीमध्ये बोगस अर्ज दाखल केलेल्या ४० सीएससी केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कळसाईत यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात कृषी अधिकारी माधव चामे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास श्री. गायकवाड करीत आहेत.
गुन्हा दाखल करण्यात आलेले सीएससीधारक
संदीप गुट्टे परळी, लक्ष्मण ढवळे पिंपरखेड, शुषांत भिसे परभणी, बाजीराव आंधळे, परळी, अली उस्मान शेखस परळी, स्वप्नील सुनील कोसबाड, शिवशंकर लांबस पुणे, शरद नागरगोजेस नांदेड, नवनाथ फडस किनगाव, धनराज चिखलभाडे, नितीन डोंगरे, पुणे, धोंडीबा पोटभरे, परळी, दिपक आंधळे, परळी, गोविंद चोधरी, परडवाडी, बिजेश मिश्रा, जनार्धन दोंड, परळी, परमेश्वर पावडे, दिग्रस, (ता. कंधार),
विशाल कदम, वाळकी, (ता. हदगाव), अमित तिवारी, हरदोई, उत्तर प्रदेश, अमोल शेप, लाडझरी, दत्ता बोडके, मिरवट, (जि. बीड), मिरा चाटे, धर्मापुरी, संतोष चिंद्रेवार, गुन्टूर, नांदेड, वैभव गुंगे, पवन नागरे, गोपाळ घुगे, परळी, दिनकर नागरवाड, महेश गरजे, मोहितकुमार, परमेश्वर वाघ, मोहपुरी, उमेश मुंडे, परळी, संभाजी शिंदे, मुखेड इतर सात जणांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.