
Parbhani News: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील गावे आणि तांडे मिळून २५ ठिकाणी महसुली अभिलेख्यानुसार पेरणी योग्य नसलेल्या २९ हजार ४७७.७० हेक्टर क्षेत्रावर पीकविमा भरलेले १२ हजार ६४४ बोगस विमा अर्ज विमा कंपनीने रद्द (रिजेक्ट) केले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील महसुली अभिलेख नसलेल्या गावातील तसेच शासकीय क्षेत्रावर भरलेल्या १,८१४ बोगस विमा अर्जांची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
खरीप २०२४ मध्ये दाखल पीकविमा अर्जाची पीकविमा पोर्टलवर गावनिहाय पडताळणी केल्यानंतर महसुली अभिलेख्यानुसार पेरणी योग्य भोगौलिक क्षेत्र नसलेल्या गावातून अर्ज दाखल केल्याचे आढळून आले. बोगस अर्ज पात्र ठरले तर क्षेत्र सुधार गुणांक (एरिया करेक्शन फॅक्टर) लागू होईल.
इतर शेतकऱ्यांना कमी विमा रक्कम मिळेल. शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होईल. सत्यता पडताळणी करून बोगस पीकविमा अर्ज रद्द करावेत, अशी मागणी शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये महसूल प्रशासनाकडे केली होती. पडताळणीनंतर परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ८ तालुक्यांतील २५ गावे, तांडे याठिकाणच्या पेरणीयोग्य नसलेल्या २९ हजार ४७७.७० हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेले १२ हजार ६४४ अर्ज आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने रद्द केले आहेत.
तसेच बोगस पीकविमा अर्ज दाखल करणाऱ्या १२१ सीएससी सेंटरचे परवाने रद्द करण्याची शिफारस केली. याप्रकरणी शेतकरी तसेच सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत महसूल विभागास कळविले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात अठराशेवर बोगस विमा अर्ज
हिंगोली जिल्ह्यात २०२४ च्या खरिपात पीकविमा पोर्टलवर महसुली अभिलेख नसलेल्या गावातील तसेच शासकीय क्षेत्रावर बोगस पीकविमा भरल्याचे आढळून आले आहे. त्यात स्वतः भरणा केलेले १०५ शेतकरी तसेच सीएससी सेंटरद्वारे विमा भरणा केलेले १ हजार ७०९ मिळून एकूण १ हजार ८१४ अर्ज आहेत. कृषी सहायकामार्फत पडताळणी केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले.
परभणी जिल्हा खरीप २०२४ नाकारलेले पीकविमा अर्ज, क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गाव पीकविमा अर्ज विमा संरक्षित क्षेत्र
कैलासवाडी ७६ २४२.७७
कौटुंबवाडी १५५ ३३१.७७
अंगलगाव तांडा १८३ ४६८.०१
चौधरणी खुर्द २८ ५२.४३
केहाळ तांडा २० ४९.४३
पिंपळगाव काजळे तांडा २९ ५७.४१
पोखर्णी तांडा ३१४ ८३८.७३
सेवालाल नगर ३२ १२७.६८
तेलवाडी ३१६ ८०३.२६
मानवतरोड २८१ ६४६.७२
कानसूर तांडा २४६ ५९३.३८
टाकळगव्हाण तांडा ६३१ १४६७.६२
सोनपेठ ४१४ १२५२.९३
सोनपेठ (एमसीएल) ७८७ २१९८.२८
तुकाई तांडा २४७ ५३३.९९
भाऊचा तांडा १२६४ २८३५.७०
कोथाळा तांडा १७५ ३९५.८४
लोहिग्राम तांडा २२५ ४९७.००
मन्सीराम तांडा ३८३ ९९५.२०
रेवा तांडा २०७९ ३५९९.९९
सखाराम तांडा ३४१ ९०४.१८
आनंदनगर २३६० ५१९१.९८
मोजमाबाद तांडा ३९६ ९९६.५८
रामापूर तांडा १३४१ ३६६६.३९
बामणी ३२१ ७३०.४६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.