Cotton Seed
Cotton Seed Agrowon

Cotton Seed : तेलंगण, आंध्रातील कापूस बियाणे यवतमाळ जिल्ह्यात दाखल

Kharif Sowing Season : पेरणी हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून कापूस बियाणे दाखल होत आहे.
Published on

Yavatmal News : पेरणी हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून कापूस बियाणे दाखल होत आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीकरिता आणण्यासाठी खासगी वाहनचालकांना आर्थिक प्रलोभन दिले जात आहे. शेतकऱ्यांनाही बियाण्यांवर सूट दिली जात असल्याची माहिती आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. शेतकऱ्यांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी अप्रमाणित बियाणे विकणारे सक्रिय झाले आहेत.

Cotton Seed
HTBT Cotton Seed : सव्वा लाखाचे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे जप्त

१५ मे नंतर कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांना विक्रीचे आदेश कृषी सेवा केंद्र चालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात केवळ बियाण्यांचा साठा केला जात आहे. पावसापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अप्रामाणित बियाणे विकण्याचा परराज्यांतील काहींचा डाव आहे.

Cotton Seed
Cotton Seed Rate : कापसाच्या प्रत्येक पाकिटाची ९०१ रुपये किंमत निश्चित

यासाठी खासगी वाहनचालकांना वेगवेगळी आमिषे दाखविली जात आहेत. शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी वाहनचालकांना आर्थिक लाभ दिला जात असल्याची चर्चा आहे. शिवाय, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाणे रकमेवरही लाभ दिला जात आहे.

बियाण्यांच्या दरात शेतकऱ्यांनाही सवलत दिली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, वाहनचालकांना संबंधितांकडूनच वाहनभाडे दिले जात असल्याची माहिती आहे. कमी किमतीत बियाणे मिळत असल्याने शेतकरी अशा आमिषांना बळी पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com