
Amaravati News : तणनाशक सहनशील बीटी कॉटम (एचटीबीटी) या प्रतिबंधित बियाण्याची शंभर पाकिटे कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता. ८) जप्त केली.
अमरावती शहरातील वेलकम पॉईंट येथे हा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. अमरावती जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई असून एचटीबीटी बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे, वेलकम पॉइंट अमरावती येथे एचटीबीटी कापूस बियाणे येणार असल्याची खबर कृषी विभागातील पथकाला मिळाली. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालक अमरावती येथील तंत्र अधिकारी राजेश जाणकार, विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी संजय पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी उद्धव भायेकर, मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी विराग देशमुख यांच्यासह घटनास्थळी सापळा रचन्यात आला. तिथे संशयास्पद एक इसम दोन पोते घेऊन उभा असलेला आढळून आला.
पथकातील सदस्यांना संशय आल्यामुळे त्याला विचारणा केली असता तो घटनास्थळी मुद्देमाल सोडून पळून गेला. तिथे सापडलेल्या दोन बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये अनधिकृत व प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाण्याची १०० पॅकेट सापडलीत. या बियाण्याची किंमत १ लाख २५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दिव्यशक्ती सीड्स गांधीनगर प्रायव्हेट लिमिटेड व फरार अज्ञाताविरुद्ध गाडगे नगर पोलिस ठाण्यात बियाणे कायदा १९५५ कापूस बियाणे अधिनियम २००९, वजन व मापे कायदा कलम ६ कापूस किंमत कायदा २०१५ अंतर्गत व जीवनावश्यक कायदा १९५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.